Home जालना रांजणीत नमो चषक क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्घाटन सतीश घाटगे यांच्या पुढाकारातून आयोजन...

रांजणीत नमो चषक क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्घाटन सतीश घाटगे यांच्या पुढाकारातून आयोजन :  युवा खेळाडूंचा मोठा प्रतिसाद

25
0

आशाताई बच्छाव

IMG_20240206_091722.jpg

रांजणीत नमो चषक क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्घाटन
सतीश घाटगे यांच्या पुढाकारातून आयोजन :  युवा खेळाडूंचा मोठा प्रतिसाद.                           घनसावंगी /जालना दिलीप बोंडे ब्युरो चीफ: युवकांमधील क्रीडा कौशल्याला वाव मिळावा यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील नमो चषक क्रीडा महोत्सवास रविवारी घनसावंगी मतदारसंघात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन तथा भाजप नेते सतीश घाटगे यांच्या हस्ते रांजणी येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे तर समृद्धी साखर कारखान्याच्या मैदानावर माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नमो चषक व्हॉलीबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ झाला.

या उद्घाटन सोहळयास  भाजपचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव बोबडे, युवा मोर्चा अध्यक्ष शिवाजीराव कंटुले, माजी सभापती नामदेव ढाकणे, प्रकाश टकले, परीक्षित शिंदे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गणेश खरात, किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष  गजानन ढेरे, सुदर्शन राऊत, श्रीमंत बाप्पा पोकळे, प्रभाकर देशमुख, विधानसभा संयोजक पुरुषोत्तम उढाण, दत्तात्रय टापरे, मधुकर देशमुख, संजय जाधव रामेश्वर जाधव, उद्धव काकडे, अंकुश तांगडे, किरण भुतेकर, विजय वरखडे, सुनिल पोकळे, उद्धव यादव, प्रभाकर धांडे, लक्ष्मण काटे, वैभव काळे,
भाजप नेते तथा समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांच्या पुढाकारातून दोन्ही ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, विजेत्या संघाना रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील युवा खेळाडूच्या कौशल्य गुणांना वाव मिळावा तसेच त्यांना राज्य आणि देश स्तरावर त्यांचे कौशल्य दाखवता यावे म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात जालना व घनसावंगी तालुक्यातील क्रिकेट संघाच्या स्पर्धा होत आहे. स्पर्धेचे संयोजक पुरुषोत्तम उढाण,  विठ्ठल देशमुख व राजकुमार

Previous articleप्रेम म्हणजे काय? **************************
Next articleवृध्दाश्रम
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here