Home जळगाव यावलचे सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी जहाँगीर तडवी शासनाच्या उत्कृष्ठ अभियंता पुरस्काराने सन्मानित

यावलचे सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी जहाँगीर तडवी शासनाच्या उत्कृष्ठ अभियंता पुरस्काराने सन्मानित

45
0

आशाताई बच्छाव

IMG-20230921-WA0018.jpg

यावलचे सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी जहाँगीर तडवी शासनाच्या उत्कृष्ठ अभियंता पुरस्काराने सन्मानित

खान्देश विभागीय संपादक, योगेश पाटील.

यावल येथील तालुक्यातील बोरखेडा गावात राहणारे व आदीवासी कुटुंबात जन्मले व यावल येथे सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असलेले उपविभागीय अधिकारी जहाँगीर शावखा तडवी यांचा विविध मान्यवरांच्या उपस्थित महाराष्ट्र शासनाच्या उल्लेखनिय कामगिरी करणारे अभिमंता या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्यांना मिळालेल्या या पुरस्कार बद्दल समाजातील विविध संघटनांच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे.
यावल तालुक्यातील सातपुडा पर्वता च्या पायथ्याशी असलेल्या बोरखेडा या आदीवासी गावात जन्माला आलेले जहाँगीर शावखा तडवी हे यावल येथील सार्वजनिक बांधकाम विभागात उपविभागीय अधिकारी म्हणुन कार्यरत असुन, त्यांचे नुकतेच षण्मुखानंद सभागृह माटुंगा मुंबई येथे संपन्न झालेला महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री ना. रविन्द्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव श्रीमती मनिषा पाटणकर म्हैसकर व
आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण सोहळयात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या अभियंतांना शासनाच्या दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने गौरविण्यात आले, यात जहाँगिर शावखा तडवी यांचा देखील उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचे सर्व समाज बांधव, यावल विभागातिल सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व त्यांचे सर्व सह कर्मचारी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात .

Previous articleकोद्री येथील कर्ज बाजारी अल्पभुधारक वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या.!
Next article४ लाखांची लाच घेताना बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंताला अटक!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here