Home बुलढाणा कोद्री येथील कर्ज बाजारी अल्पभुधारक वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या.!

कोद्री येथील कर्ज बाजारी अल्पभुधारक वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या.!

107
0

आशाताई बच्छाव

IMG-20230921-WA0009.jpg

कोद्री येथील कर्ज बाजारी अल्पभुधारक वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या.!

विहिरीमध्ये उडी घेऊन संपवली जीवन यात्रा.

(युवा मराठा न्यूज नेटवर्क ब्युरो चीफ बुलढाणा)- संग्रामपुर तालुक्यातील कोद्री येथील अल्पभुधारक शेतकऱ्यांने बँकांचे कर्ज उसनवार घेतलेल्या पैसे कर्जाचे वाढते डोंगर व सतत नापीकी या नैराश्य पोटी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि २० सप्टेंबर रोजी सकाळी ५:१५ वाजता उघडकीस आली मृतक शेतकऱ्याचे नाव प्रभाकर भाऊराव खोंड वय ६० वर्ष असून याबाबत थोडक्यात हकिकत असे प्रकारे आहे कि तालुक्यातील कोद्री येथील वृद्ध अल्पभुधारक शेतकरी प्रभाकर खोंड यांच्या कडे सेंन्ट्रल बॅक व जिल्हा केंद्रीय सहकारी बॅक शाखा पातुर्डाचे कर्ज असुन त्यात नातेवाईक जवळच्या व्यक्ती कडून घेतलेले उसनवार पैसे व यावर्षी माहे जुलै महिण्यात अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे झालेले नुकसान आणि त्यातून काही प्रमाणात वाचलेले पिकाचे त्यानंतर दिड महिणा पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढ खुटल्याने उत्पन्नात घट होण्याची शक्यता सतत नापीकी बॅकांचे व उसनवार घेतलेल्या कर्जाची परत फेड कशी करावी असे शेतकरी मनाने सतत बडबड करित होते कुटुंबातील व्यक्ती जवळ बोलत होते त्यांचा स्वभाव चिडचिड झाला होता असे आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबांनी बोलताना सांगितले कर्जाचे वाढते डोंगर शेतातुन येणाऱ्या उत्पन्नातुन कर्जाची परत फेड करणे शक्य नसल्याने नैराश्य पोटी कोद्री ते कुंदेगाव रसत्यावरिल भवानी मातेच्या मंदिराला लागुन असलेल्या विहिरीत उडी घेऊन आपली जिवन यात्रा संपवली या बाबत कोद्री गावाचे पोलीस पाटील संजय प्रल्हाद खोंड यांनी तामगाव पोस्टे ला कळविल्यावरून तामगाव पोलीस घटना स्थळी दाखल झाले मृतक शेतकऱ्याचे प्रेत बाहेर काढून वरवट बकाल ग्रामीण रुग्णालयात श्वविच्छेदन झाल्यानंतर कोद्री येथे शोकाकुल वातावरणात मृतक शेतकऱ्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असुन पोलीस पाटील संजय खोंड यांच्या तोंडी रिपोर्ट वरुन तामगाव पोलीसांनी मर्ग दाखल केला असुन तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रमोद उलेमाले यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पातुर्डा पोलीस चौकीचे बीट जमादार नंदकिशोर तिवारी करित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here