Home Breaking News 🛑 मराठा समाजा तर्फे विविध मागण्यांसाठी वेंगुर्ले तालुका तहसीलदारांना निवेदन 🛑

🛑 मराठा समाजा तर्फे विविध मागण्यांसाठी वेंगुर्ले तालुका तहसीलदारांना निवेदन 🛑

94
0

🛑 मराठा समाजा तर्फे विविध मागण्यांसाठी वेंगुर्ले तालुका तहसीलदारांना निवेदन 🛑
✍️ सिंधुदुर्ग 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

वेंगुर्ला :⭕मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात वेंगुर्ला तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी सोमवारी येथील तहसिल कार्यालयाला धडक दिली. यावेळी विविध १० मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले. या निवेदनावर तालुक्यातील सुमारे ११ हजार ५७९ मराठा बांधवांच्या सह्या घेण्यात आल्या. मराठा समाजाच्या मागण्या न सोडवल्यास पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक होईल, असा इशारा देऊन आमच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली.

वेंगुर्ला तालुका मराठा समाजाच्या वतीने जोरदार घोषणा देत सोमवारी येथील तहसिल कार्यालयाला धकड देण्यात आली.

यावेळी मराठा समाज वेंगुर्ला तालुकाध्यक्ष सिद्धेश परब, सचिव राजबा सावंत, खजिनदार सखाराम ठाकूर, सल्लागार एम के गावडे, रवींद्र परब, तुळशीदास ठाकूर, दिलीप परब, प्रसंन्ना देसाई, मकरंद परब, निलेश गवस, श्यामराव चव्हाण, सुरेंद्र चव्हाण, मिलिंद शेटकर, पराग सावंत, हेमंत गावडे, संजय गावडे, सुनील परब यांच्यासह अन्य समाजबांधव उपस्थित होते.

कोपर्डी हत्याकांडातील दोषी आरोपींच्या अपिलाची सुनावणी त्वरित करावी व आरोपींना फासावर लटकवावे, मराठा आरक्षण प्रवर्गातून नोकरी मिळविलेल्या व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश संरक्षित करावे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचा पुरावा द्यावी लागणारी अट शिथिल करावी, सारथी संस्था पुन्हा पुनर्जीवित करावी, मराठा आंदोलकांवरील खटले त्वरित मागे घ्यावेत खास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथील घटनेतील आरोपींवरील खटले मागे घेण्यात यावेत, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना व पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल ४३ प्रमाणे मराठा विद्यार्थ्यांसाठी पुन्हा सुरू कराव्यात, बिंदुनामावली घोटाळा करून खुल्या प्रवर्गातील जागा अडवून नसलेल्या उमेदवारांवर कारवाई करावी, पदोन्नतीतील आरक्षण देण्याबाबत असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या दिशा निर्देशांचे पालन करावे आणि मराठाद्वेष्ट्या वर्षा गायकवाड आणि विजय वडेट्टीवार यांची मंत्रिमंडळातून त्वरित हकालपट्टी करावी अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या…⭕

Previous article🛑 कामगार व उत्पादन मंत्री यांच्या संपर्क कार्यालया समोर….! ठिय्या आंदोलन 🛑
Next article🛑 विश्वास नांगरे पाटील यांनी घेतली….! शरद पवारांची भेट 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here