• Home
  • 🛑 कामगार व उत्पादन मंत्री यांच्या संपर्क कार्यालया समोर….! ठिय्या आंदोलन 🛑

🛑 कामगार व उत्पादन मंत्री यांच्या संपर्क कार्यालया समोर….! ठिय्या आंदोलन 🛑

🛑 कामगार व उत्पादन मंत्री यांच्या संपर्क कार्यालया समोर….! ठिय्या आंदोलन 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

मंचर -⭕कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मंचर (ता. आंबेगाव) येथील संपर्क कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मंत्री वळसे पाटील यांनी स्वत: आंदोलकांना सामोरे जावून आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारुन मराठा आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार ठाम असल्याची ग्वाही दिली.

यावेळी शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, मंचर बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, माजी सभापती वसंत भालेराव, कैलास काळे, निळू काळे, सखाराम काळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

मराठा क्रांती मोर्चाचे दत्ता गांजाळे, अजय घुले, शरद पोखरकर, वसंत बाणखेले, हभप बाजीराव महाराज बांगर, आशिष घोलप, दीपक जाधव, योगेश बोऱ्हाडे, कुणाल बाणखेले, गणेश महाराज घोडेकर, रोशन शिंदे, जयदिश घिसे, सागर काळे, अमोल घोलप, वैष्णवी गांजाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री वळसे पाटील म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे.

त्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारने नियुक्‍त केलेली मराठा आरक्षण समितीच्या वेळोवेळी बैठका होऊन आरक्षण न्यायालयीन लढ्यात जिंकण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहे. भविष्यात ही लढाई आपण यशस्वीपणे जिंकू, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला….⭕

anews Banner

Leave A Comment