Home परभणी आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते पेवर ब्लॉक, सीसी रोड व नाली...

आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते पेवर ब्लॉक, सीसी रोड व नाली बांधकामाचे उद्घाटन

55
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220528-WA0026.jpg

आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते पेवर ब्लॉक, सीसी रोड व नाली बांधकामाचे उद्घाटन

 

प्रतिनिधी:-शत्रुघ्न काकडे पाटील युवा मराठा न्युज नेटवर्क ब्युरो चीफ

(परभणी) जिंतूर:-तालुक्यातील सावंगी म्हाळसा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या येलदरी कॅम्प सावंगी म्हाळसा, हिवरखेडा या ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येलदरी कॅम्प मध्ये सीसी रोडचे उद्घाटन आज गुरुवारी संपन्न झाले.तालुक्यातील सावंगी म्हाळसा ग्रामपंचायत अंतर्गत येलदरी कॅम्प येथील वसाहती मध्ये मागील ३०ते ४०वर्षांपासून ये जा करण्यासाठी रस्ता उपलब्ध नव्हता, त्यामुळे जिंतुर विधानसभेच्या आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या प्रयत्नातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत सन २०२१-२२ या वर्षासाठी परभणी जिल्ह्यातील मंजूर करण्यात आलेल्या कामां पैकी मौजे सावंगी म्हाळसा ग्रामपंचायत अंतर्गत येलदरी वसाहत येथे पेवर ब्लॉक, सीसी रोड व नाली बांधकामाचे उद्घाटन जिंतूर सेलू विधानसभेचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी सावंगी म्हाळसाचे माजी सरपंच प्रमोद चव्हाण जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक भगवानरावजी महाळणार, ब्रिजगोपाल तोष्णीवाल, विजय चव्हाण, बाळासाहेब माकोडे, प्रदीप चव्हाण, गजाननराव चव्हाण, दीपक चव्हाण, महेंद्र लाटे, रमेश कंठाळे हिरामण चव्हाण, माधव चव्हाण, प्रदीप चौधरी, यांच्या सह मोठ्या संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी जिंतूर तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले येलदरी येथील पूर्णा नदीवरील पुलाच्या मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याबाबतीत संबंधित विभागाकडून निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन पुलाच्या बांधकामाचे उद्घाटन करण्यात येईल असे सांगितले. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली.

Previous articleभेळ व्यावसायिक, फोटोग्राफर ते उपसरपंच…. थक्क करणारा प्रवास
Next articleअनसिंग परिसरातून सर्रास अवैध गौण खनिज वाहतूक * गौण खनिज वाहतूक करण्यासाठी दलाल सक्रीय
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here