Home वाशिम अनसिंग परिसरातून सर्रास अवैध गौण खनिज वाहतूक * गौण खनिज वाहतूक करण्यासाठी...

अनसिंग परिसरातून सर्रास अवैध गौण खनिज वाहतूक * गौण खनिज वाहतूक करण्यासाठी दलाल सक्रीय

53
0

आशाताई बच्छाव

IMG-20220529-WA0006.jpg

अनसिंग परिसरातून सर्रास अवैध गौण खनिज वाहतूक
* गौण खनिज वाहतूक करण्यासाठी दलाल सक्रीय
* रॉयल्टी 2 ब्रास तर माल 5 ब्रास
* नो रॉयल्टी माञ मालाची गॅरंटी असे वाहन चालक सांगतान
वाशीम : प्रतिनिधी ( गोपाल तिवारी )
पुसद – वाशीम मार्गावर अनसिंग येथे अनेक दिवसांपासून अवैध गौण खनिज वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे . विशेषता यादरम्यान वाहतूक करणारी ही वाहने रस्त्याच्या मध्यभागी लावत ,या रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण करत आहेत . याकडे येथील मंडळ अर्धिकारी व तलाठ्यांकडून कारवाई करण्याकडे कानाडोळा होत आहे . अनसिंग व अनसिंग परिसरातील ट्रॅक्टर चालकाकडून दिवस-रात्र अवैध गौण खनिज वाहतूक सुरू आहे . विशेषता मुख्यरस्त्यावरून ही वाहतूक होत असताना त्यांच्यावर मात्र येथील महसूल कर्मचाऱ्याकडून कारवाई होत नाही .मुख्य रस्त्यावर ही वाहने लावतात .एसटी, दुचाकी व इतरही आवश्यक वाहतुकीला अडथळा निर्माण करत आहेत . त्यामुळे येथील अवैध गौण खनिज वाहतूक करणार्‍यांवर कारवाई करण्याच्या सूचना संबंधित महसूल अधिकाऱ्यांना द्याव्या अशी मागणी अनसिंग येथील नागरीक करीत आहे . व रॉयल्टी च्या तीन पट गौण खनिज ची विक्री होत आहे प्रति सहा हजार रुपये ब्रॉस इतकी वसुली डिपर चालक करीत आहे . एका डिपर मध्ये सहा ब्रॉस इतका माल आनत्या जातो व याकडे वरिष्ठांनी लक्ष दयावे व ज्यांच्या कडे खनिज चा स्टॉक आहे . त्याची रॉयल्टी चैक करावी अनेत्ता त्या रेतीवर सॉक्स ला सील लावावे . अशी मागणी नागरीक करीत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here