Home गडचिरोली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी मेडिकल कॉलेज करिता ठराव घ्यावा आमदार डॉक्टर देवरावजी होळी...

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी मेडिकल कॉलेज करिता ठराव घ्यावा आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे जिल्हा सरपंच संघटनेला पत्र

53
0

आशाताई बच्छाव

IMG-20220529-WA0002.jpg

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी मेडिकल कॉलेज करिता ठराव घ्यावा

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे जिल्हा सरपंच संघटनेला पत्र

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

गडचिरोली जिल्ह्यात मंजूर झालेले मेडिकल कॉलेज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या नावावर रद्द करून गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांची फसवणूक राज्यातील महा विकास आघाडीचे सरकार ने केली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयाचा विरोध करून गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्याच्या सोयी सुविधा करिता अत्‍यंत आवश्‍यक असलेले मेडिकल कॉलेज प्रथमता मंजूर करावे व त्यानंतरच जिल्ह्यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारावे अशा मागणीचा ठराव जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी घ्यावा व शासन स्तरावर त्याबाबत पाठपुरावा करावा अशी मागणी करणारे पत्र आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी जिल्हा सरपंच संघटनेला दिले.
यावेळी जिल्हा सरपंच संघटनेचे अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष यांचेसह पदाधिकारी व सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी यापूर्वीच शासनाकडे मागणी केली असून त्याबाबतचे निवेदन त्यांनी शासन स्तरावर ती पाठवलेले आहे . एवढेच नाही तर जिल्ह्यातील विविध संघटनांच्या ,विविध पक्षाच्या नेत्यांना , सामाजिक कार्यकर्त्यांना भेटून त्याबाबतचे निवेदन पत्र देवून करीत आहेत. पत्रातून शासनस्तरावर आपणही पाठपुरावा करावा अशी विनंती सर्वांना करीत आहेत.

जिल्ह्याची सरपंच संघटना महत्त्वपूर्ण असून प्रत्येक ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामपंचायतीने याबाबत कठोर भुमिका घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले.

जिल्हा सरपंच संघटनेचे पदाधिकारी यांनीही आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची भेट याबाबतचे निवेदन दिले. आपण ग्रामपंचायत स्तरावरून राज्य सरकारला याबाबत ठराव घेऊन निवेदन द्यावे तसेच प्रत्येक गावात आवश्यकता पडल्यास या आंदोलन करावे असे आवाहन त्यांनी सरपंच संघटनेच्या भेटीदरम्यान केले

Previous articleअनसिंग परिसरातून सर्रास अवैध गौण खनिज वाहतूक * गौण खनिज वाहतूक करण्यासाठी दलाल सक्रीय
Next articleस्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांच्या विचारधारेतूनच जीवनाची सार्थकता… !
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here