राजेंद्र पाटील राऊत
!!बाबासाहेब आंबेडकर हे सर्वसामान्यांना न्याय व अधिकार मिळवून देणारे लढवय्ये पुरुष!!
आमदार डॉक्टर देवरावजी होळी
!!डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित चामोर्शी , घोट , आष्टी , अनखोडा , येणापुर येथे आयोजित कार्यक्रमात वाहिली आदरांजली!! गडचिरोली,( सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
केवळ देशाच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात अद्वितीय व अजरामर असणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार ,थोर समाज सुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वसामान्यांना न्याय व अधिकार मिळवून देणारे लढवय्ये पुरुष असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी महामानव बाबासाहेबांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त आयोजित गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील चामोर्शी , घोट , आष्टी , अनखोडा , येनापुर येथे आयोजित कार्यक्रमांना उपस्थित राहून आमदार डॉ होळी यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.व उपस्थितांना मार्गदर्शन केले व मार्गदर्शन करतांना सांगितले
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गरीब ,वंचित, शोषित, पीडित ,महिला, कामगार, शेतकरी, मजूर,शेतमजूर, अशा सर्व स्तरांवरील घटकांना न्याय हक्क व अधिकार मिळवून देण्याचे महान कार्य केले. समाजापासून बहिष्कृत करण्यात आलेल्या वंचित घटकांमध्ये ऊर्जा निर्माण करून त्यांना पुनः समाजाच्या मूळ प्रवाहात आणले. शिकाल तर शिकाल असे म्हणून सर्वसामान्यांमध्ये शिक्षणाप्रती इच्छाशक्ती निर्माण करून त्यांना संघर्षाची जाणीव करून दिली.
समाज व्यवस्थेतील विखुरलेल्या असंख्य जातींना समान हक्क मिळावा याकरिता त्यांनी आयुष्यभर काम केले. जाती व्यवस्थेमध्ये विखुरलेल्या असंख्य समाजाला एकत्रित बांधण्याचा प्रयत्न त्यांनी भारतीय राज्यघटनेतून केला. त्यांनी संपूर्ण आयुष्य सर्वसामान्य गोरगरीब लोकांच्या न्याय्य हक्कासाठी अर्पण केले. त्यांचे संपूर्ण जीवन हे जगासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. यावेळी चामोर्शी येथे ,भाजप तालुका अध्यक्ष दिलीप चलाख , युवा नेते प्रतीक राठी , दुबे गुरुजी , बंडू कुडवे घोट येथे जिल्हा परिषद सदस्य नामदेव सोनटक्के , प्राचार्य गजभिये सर, विलास उइके , आष्टी येथे माजी जिल्हा परिषद सदस्य धर्म प्रकाश कुकुडकर , उपसरपंच डोरलीगर
अनखोडा येथे समाज बांधव
व बौद्ध समाज मंडळ पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तसेच येनापुर येथे भाजप नेते मनमोहन बंडावार , सुरेश सावकार
गुंतीवार , समाज मंडळ अध्यक्ष दुधे साहेब ,राऊत साहेब व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते