Home गडचिरोली सुपर स्पेशालिटी (सर्जरी) श्रेणीमध्ये लोकमत टाईम्स एक्सलन्स हेल्थ केअर अवॉर्ड-2022 करिता *डॉ.यशवंत...

सुपर स्पेशालिटी (सर्जरी) श्रेणीमध्ये लोकमत टाईम्स एक्सलन्स हेल्थ केअर अवॉर्ड-2022 करिता *डॉ.यशवंत दुर्गे* यांचे नामांकन

151
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220414-WA0102.jpg

सुपर स्पेशालिटी (सर्जरी) श्रेणीमध्ये लोकमत टाईम्स एक्सलन्स हेल्थ केअर अवॉर्ड-2022 करिता *डॉ.यशवंत दुर्गे* यांचे नामांकन

घरात अत्यंत प्रतिकुल परिस्थिती असताना आईचे स्वप्न आणि इच्छाशक्तीच्या जोरावर डॉ.यशवंत दुर्गे यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले. त्यांनी मुंबईच्या तेरणा वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसची पदवी आणि त्यानंतर यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमएस (सर्जन) या पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
——-गडचिरोली/सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज

अवघ्या काही वर्षात गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात आपल्या वैद्यकीय सेवेने डॉ.यशवंत दुर्गे यांनी वेगळा ठसा उमटविला आहे. जिल्ह्याचे पहिले लेप्रोस्कोपिक सर्जन होण्याचा मान त्यांनी मिळविला. अहेरी तालुक्यातील महागाव या छोट्याशा गावात मजुरी करणाऱ्या कुटुंबात वाढलेले डॉ.दुर्गे यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण घोट येथील जवाहर नवोदय विद्यालयात झाले. बारावीत असताना वडिलांचा मृत्यू झाला. मुळातच हुशार असलेल्या यशवंतने डॉक्टर होऊन लोकांची सेवा करावी ही आई लक्ष्मीबाई यांची ईच्छा, पण विपरित परिस्थिती हे स्वप्न पूर्ण होणार का, याबद्दल शंका होती. अशात काही शिक्षकवृदांनी प्रोत्साहन दिले आणि यशवंत पाहता पाहता लेप्रोस्कोपिक सर्जन झाला. पत्नी स्रीरोग तज्ज्ञ डॉ. खुशबू दुर्गे यांच्या सहकार्याने आणि वर्गमित्र अनिल तिडके यांच्या व्यवस्थापनात गडचिरोलीत १ ऑगस्ट २०१६ रोजी त्यांचे ‘सिटी हॉस्पिटल’ सुरू झाले. या रुग्णालयात लॅप्रोस्कोपिक सर्जरींसह थॉयराईड, कॅन्सर, अपेंडिक्स, ब्रेस्ट कॅन्सर, किडनीस्टोन, हायड्रॉसिल, हर्निया, गर्भाशय पिशवीची शस्रक्रिया अशा अनेक प्रकारच्या अवघड शस्रक्रिया नियमित करून आतापर्यंत हजारो रुग्णांना त्यांनी जीवदान दिले आहे. या रुग्णालयामुळे नागपूर, चंद्रपूर, ब्रह्मपुरीकडे जाणाऱ्या रुग्णांना आपल्याच शहरात योग्य उपचाराची सोय मिळाली.
वडीलाच्या मृत्यूनंतर आपल्या शिक्षणासाठी आईने घेतलेले कष्ट आणि तिचे संस्कार हे आपल्यासाठी प्रेरणादायी असल्याचे डॉ.दुर्गे सांगतात. सामाजिक जाणीवेतूनच ते आजही आठवड्यातून एक दिवस अहेरी येथे सेवा देतात.
——-

चांगल्या ऑफर्स नाकारून आपल्या लोकांची सेवा
वैद्यकीय पदवीनंतर सर्जरीमधील पदव्युत्तर पदवी (एमएस) उत्तम गुणांनी प्राप्त करणारे डॉ.यशवंत दुर्गे यांना चांगल्या पगाराच्या नोकरीच्या ऑफर्स आल्या होत्या. पण आई लक्ष्मीबाई यांनी केलेल्या सामाजिक संवेदनशिलतेच्या संस्कारामुळे त्यांनी गडचिरोली जिल्हावासियांनाच वैद्यकीय सेवा देण्याचा निर्धार केला. त्यातूनच त्यांनी शासकीय सेवेतील पहिली पोस्टिंग अहेरी येथे मागून घेतली. पुरेसा अनुभव आल्यानंतर त्यांनी स्वत:चे रुग्णालय सुरू केले. आज अहेरी, भामरागड, एटापल्ली तालुक्यापासून तर छत्तीसगडपर्यंतचे रुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी येतात.

——-

आपल्या आवडत्या डॉक्टरला मत द्या. ‘यशवंत (Yashwant)’ टाईप करा आणि ९५५२५५९९२३ वर पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here