Home विदर्भ मराठा आरक्षणावरून वातावरण तापले!; बुलडाण्यातूनही छत्रपती संभाजीराजेंना खंबीर पाठिंबा!!

मराठा आरक्षणावरून वातावरण तापले!; बुलडाण्यातूनही छत्रपती संभाजीराजेंना खंबीर पाठिंबा!!

101
0

राजेंद्र पाटील राऊत

मराठा आरक्षणावरून वातावरण तापले!; बुलडाण्यातूनही छत्रपती संभाजीराजेंना खंबीर पाठिंबा!!

बुलडाणा (ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज बूलडाणा ) : मराठा समाजाला आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी भाजपचे राज्यसभेतील खासदार संभाजीराजे भोसले आज, २६ फेब्रुवारीपासून मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाला बुलडाण्यातून अखिल भारतीय मराठा महासंघाने पाठिंबा दर्शवत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले.

जिल्हा सरचिटणीस गजानन माने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. आंदोलनात डॉ. राजेश्वर उबरहांडे, जगदेवराव बाहेकर, विठ्ठलराव येवले, संजय हांडे, अण्णा पवार, हेमंत खेडेकर, सचिन परांडे, सोनू बाहेकर, सागर काळवाघे, मंदार बाहेकर, गजानन गडाख, चिंतामणी ढवळे, दिग्विजय गायकवाड, नीलेश हरकल आदी उपस्थित होते.काय आहेत मागण्या…
मराठा समाजाला आरक्षण मिळावे. आरक्षणासाठी न्या. भोसले समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजाणी तत्काळ सुरू करून प्रक्रिया सुरू करावी. ईसीबीसी व एसईबीसी आरक्षणाच्या माध्यमातून शासकीय सेवेत निवड झालेल्या, पण अद्याप नियुक्ती न झालेल्या उमेदवारांना ज्या पदावर निवड झाली त्याच पदावर कायमस्वरुपी नियुक्ती द्यावी. सारथी संस्थेच्या सबलीकरणासाठी रोड मॅप तयार करून या संस्थेचे सक्षमीकरण करावे आणि येणाऱ्या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात यासाठी भरीव निधीची तरतूद करावी. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाद्वारे दिला जाणारा दहा लाख रुपये कर्ज व्याज परतावा हा २५ लाख रुपये करण्यात यावा. महामंडळ व्यवस्थित चालण्यासाठी, प्रशासकीय निर्णय घेण्यासाठी तसेच नवीन योजना निर्माण करण्यासाठी महामंडळास संचालक मंडळ असणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here