Home मराठवाडा पाच टक्के आरक्षणाच्या मागणीसाठी जिंतूरच्या मुस्लीम बांधवाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

पाच टक्के आरक्षणाच्या मागणीसाठी जिंतूरच्या मुस्लीम बांधवाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

333
0

राजेंद्र पाटील राऊत

जिंतूर: (विष्णू डाखुरे तालुकाप्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-
आरक्षण संघर्ष समीतीच्या वतीने नायब तहसीलदार मार्फत महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवेदन देऊन मुस्लिम समाजाला शिक्षणात 5 टक्के आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी निवेदन देण्यात आले आहे. मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्यात यावे असे निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.की,महाराष्ट्र
राज्यातील मुस्लिम समाज शैक्षणिक दृष्ट्या फार मागासलेला आहे.सच्चर कमिटी, महेमुद उर रहेमान कमिशन, रंगनाथ मिश्रा कमीशन, सारख्या अनेक समित्यांनी आपल्या अहवालात शासनास कळवले आहे. की मुस्लिम समाज शैक्षणिक, आर्थिक,राजकीय दृष्ट्या मागासलेला आहे.
त्यातच न्यायालयाने देखील मुस्लिम समाजाला शिक्षणात 5 टक्के आरक्षण द्यावे म्हणून सांगितले आहे. तरी देखील महाविआघाडी सरकारने आज पर्यंत मुस्लिम समाजाला आरक्षण दिले गेले नाही. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महाविकास आघाडी सरकारने त्वरित मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे. नसता लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशार देण्यात आला आहे या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे या निवेदनावर शोएब सिद्दिकी, मौलाना शेख मकसूद, अहेमद सिद्दिकी, शेख एजाज, शेख रहीम, शकील अहमद,
शेख पाशा, अकबर कुरेशी, तौखीर अहमद, इब्राहिमखान, शोएब खान,अस्लम कुरेशी, बाबा राज,
शेख अनिस,शेख अहमद यासह अनेक मुस्लीम
बांधवांच्या हस्ताक्षर या निवेदनावर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here