Home विदर्भ ठेचा भाकर खाऊन शेतकऱ्यांनी नोंदवला निषेध. शेतकरी पूत्रांचे जळगाव जामोद तहसिल कार्यालयावर...

ठेचा भाकर खाऊन शेतकऱ्यांनी नोंदवला निषेध. शेतकरी पूत्रांचे जळगाव जामोद तहसिल कार्यालयावर ठेचा भाकर आंदोलनं

258
0

राजेंद्र पाटील राऊत

ठेचा भाकर खाऊन शेतकऱ्यांनी नोंदवला निषेध.
शेतकरी पूत्रांचे जळगाव जामोद तहसिल कार्यालयावर ठेचा भाकर आंदोलनं.
प्रतिनिधि:-(सतिश पाटील युवा मराठा न्युज नेटवर्क) जळगाव जामोद:- मागिल वर्षी तालुक्यात मोठया प्रमाणावर सततच्या पावसामुळे आनी अतीवृष्टीमुळे सोयाबिन, कापुस, उडीद,मंग, मक्का या पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले.
नुकसानीची पाहणी झाली, पंचनामे करण्यात आलें परंतू राज्यसरकारने शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासनं दिल्यानंतरही कुठलीच मदत प्रत्यक्षात दीली नाहीं.
तसेच पीक विमा कंपनीनें मागील खरिप हंगााम २०२० तील पिक विमा हा अतीशय तुटपुंज्या स्वरुपात दीला.
यावर्षीही खरीप हंगाम २०२१ मध्ये शेतकऱ्यांचं अतोणात अस नुकसान झालेल आहे.
जळगाव जामोद तालुक्यात नुकसान मोठ्या प्रमाणावर नुकसान असताना शासनाने कुठलीच आथिर्क मदत शेतकऱ्यांना दीलेली नाहीं.
शेतकऱ्यांना शासनान त्वरीत मदत त्यांच्या बँक खात्यात जमा करावी.तसेच पीक विमा शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावा, यांसाठी आज शेतकरी पुत्रांनी ठेचा भाकर आंदोलनं करुन शासनाचा निषेध नोंदवला .
यानतरही शासनाने शेतकऱ्यांना
मदत न दिल्यास शेतकरी पूत्रांच्या माध्यमातुन तीव्र स्वरुपाचा लढा उभारण्यात येइल.
यावेळी अक्षय भालतडक, अमोल दाभाडे, आकश आटोळे वैभव जाणे धनंजय सरोकार मोहन गावंडे, प्रश्नांत तायडे,वैभव वाणखडे, वायझोडे, रामा रोठे ,ज्ञानेश्वर चोपडे, सदाशिव जाणे ,नीशिकांत देशमुख ,तुकाराम गटमने ,सय्यद बाउद्दीन ,सतीश हुरसाळ, शुभम रोटे ,विनोद पाटील ,छोटू पाटील, अभी पाटील ,अण्णा पाटील, अजय गिरी, सुरज वाघ, अविनाश भालतडक, दत्ता खूपसे, निलेश हूर्साळ, उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here