Home बुलढाणा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

121

आशाताई बच्छाव

IMG-20220603-WA0036.jpg

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर
ब्यूरो चिफ स्वप्निल देशमूख यूवा मराठा न्यूज बूलडाणा
14 जुन रोजी मतदार यादी होणार प्रसिद्ध
बुलडाणा,:- दि. 3 : माहे जानेवारी 2021 ते एप्रिल 2022 मध्ये मुदत संपलेल्या, तसेच माहे मे 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार माहे जानेवारी 2021 ते सप्टेंबर 2022 पर्यंतच्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकांसाठी 31 मे 2022 रोजी प्रसिद्ध मतदार यादी ग्राह्य धरावयाची आहे.

प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 14 जून 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना असल्यास 14 ते 17 जून या कालावधीत दाखल करू शकणार आहेत. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी 22 जून रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील माहे जानेवारी 21 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत 13 ग्रामपंचायतीचा कालावधी संपुष्टात आला आहे. या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे तयार करून प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी 14 जून रोजी ग्रामपंचायत, तलाठी सजा, मंडळ अधिकारी कार्यालय, पंचायत समिती कार्यालय व तहसिल कार्यालयाचे सुचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या मतदार यादीवर ज्या नागरिकांना हरकती व सुचना सादर करावयाच्या आहेत, त्यांनी 17 जून पूर्वी तहसिलदार यांच्याकडे सादर कराव्यात. याबाबतची नोंद सर्व नागरिकांनी घ्यावी, असे जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी कळविले आहे.

Previous articleयुवा स्वाभिमान पार्टी मध्ये रवी राणा यांच्या हस्ते तालुक्का संग्रामपूर मध्ये झाल्या नवीन आणि फेर पद नियुक्त्या                                               
Next articleरामनगर भौरी मळा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.