Home Breaking News पावसामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांचे अतोनात हाल, विश्रांतीगृहात शिरलं पाणी 🛑 मुंबई ( साईप्रजित...

पावसामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांचे अतोनात हाल, विश्रांतीगृहात शिरलं पाणी 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

114
0

🛑 पावसामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांचे अतोनात हाल, विश्रांतीगृहात शिरलं पाणी 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 6 जुलै : ⭕ मुंबईची दुसरी लाईफ लाईन म्हणून बेस्ट ओळखली जाते. या कोरोनाच्या संकटकाळात बेस्टचे कर्मचारी पावसाळामध्ये अहोरात्र परिश्रम घेत आहे. मात्र या बेस्टच्या कोरोना योद्ध्यांना कसलीही बेस्टकडून सुविधा मिळत नाही. शनिवारी झालेल्या पावसामुळे कन्नमवार नगरच्या बेस्टचा विश्रांती गृहात पावसाचे पाणी शिरल्याने कर्मचाऱ्यांचे अतोनात हाल झाले आहे. त्यामुळे बेस्ट प्रवाशांनाच्या या कारभारावर कर्मचाऱ्रीयांनी संताप व्यक्त केला.

कोरोना महामारीच्या काळात मुंबई शहरांमधे वीजपुरवठा आणि बृहन्मुंबई परिसरात सार्वजनिक प्रवासी वाहतूक या सेवा सातत्याने देण्याचे काम बेस्ट कामगार करत आलेले आहेत. सेवा देत असताना शेकडो बेस्ट कामगार कोरोनाची लागण झाली आहे. यात काहीचा दुर्दैवाने मृत्यू सुद्धा झालेला आहे. तरी सुद्धा आपल्या जीवाची आणि कुटुंबियांची पर्वा न करता बेस्ट कर्मचारी गेल्या तीन महिन्यांपासून आपली सेवा देत आहे. मात्र बेस्टच्या अनेक आगारांमध्ये चालक-वाहकांना विश्रांती करण्यासाठी सुविधाच नाही. कुठे बाकडे आहेत, तर पंखा नाही. कुठे पिण्याचे पाणी, शौचालयाची व्यवस्थाच नाही. तेथे चार भिंतीच्या आत काही प्रमाणात चालक-वाहकांना सुरक्षित तरी वाटते. परंतु कन्नमवार नगरमधील बेस्टच्या चौकीची अवस्था अत्यंत दयनीय आहे. मुसळधार पावसामुळे बेस्टच्या कन्नमवार नगर येथील विश्रांती गृहात पावसाचे पाणी शिरल्यामुळे कर्मचाऱ्यांचे चांगलेच हाल झाले आहेत. पाणी शिरल्यामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांना बाकड्यावर विश्रांती करावी लागली आहे. बेस्टकडून नेहमी पावसाळ्यापूर्वी प्रत्येक वर्षी लाखों रुपये खर्च करून, बेस्टच्या चौक्या, विश्रांतीगृह, बेस्टचे बस स्टॉपची देखभाल आणि दुरुस्ती केली जाते. मात्र पावसाळ्यात परिस्थिती जैसे थे असते, प्रत्येक वर्षी हे रडगाणे असेच सुरु आहे.

बेस्ट कामगाराने व्यक्त केला संताप बेस्ट प्रशासनाने बेस्ट कामगार हा कोविड योद्धा म्हणून त्यांची ख्याती बनली आहे. पण त्याच्याकडे गेले प्रत्येक वर्षे पावसाळ्यात चौकीकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. देशभरात स्वछता अभियान चालविले जाते आणि पण बेस्ट कर्मचाऱ्याच्या आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जात आहे. आज अनेक आगारात पिण्याच्या पाण्याचे नळ व पाण्याची टाकी नाही, तेथे कधीच वेळेवर साफ सफाई होत नाही. त्यामुळे अशा कठीण परिस्थिती बेस्टच्या या योंद्धाना मरण्यासाठी बेस्ट प्रशासनाने सोडले आहे असा संताप बेस्ट कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here