• Home
  • मुंबईसह उपनगरातील नागरिकांना हवामान विभागाचा अलर्ट; पुढील 24 तास महत्त्वाचे 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबईसह उपनगरातील नागरिकांना हवामान विभागाचा अलर्ट; पुढील 24 तास महत्त्वाचे 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 मुंबईसह उपनगरातील नागरिकांना हवामान विभागाचा अलर्ट; पुढील 24 तास महत्त्वाचे 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 6 जुलै : ⭕ गेल्या दोन दिवसांपासून पावसाने मुंबई व उपनगरांना झोडपून काढले आहे. सतत बरसणाऱ्या पावसामुळे मुंबई भागातील अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आधीच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मुसळधार पाऊस सुरू असल्याने नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

येत्या 24 तासात मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे तापमानात घट होणार असून कमाल ते किमान तापमान 27 ते 24 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे.

मुंबई, ठाण्यासह उपनगरात शनिवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसानं अक्षरश: धुमशान घातलं. रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. मुंबई, ठाण्यासह उत्तर कोकणात आजही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. शनिवारी मुंबईसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा, कोल्हापुरात पावसानं जोर धरल्यानं नदी-नाल्यांना पूर आला होता.

ठाणे-दिवा-डोंबिवली-कल्याण-भिवंडी परिसरात रात्रभर पाऊस सुरू होता. त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. उत्तर कोकणात रेड अलर्ट, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील काही भागांमध्ये रिमझिम पाऊस पडेल मराठवाड्यात आज पाऊस दडी मारणार असल्याचंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.⭕

anews Banner

Leave A Comment