राजेंद्र पाटील राऊत
डॉ. अण्णासाहेब चौगुले यांना स्मृतीदिनानिमित्त मान्यवरांकडून आदरांजली.
कोल्हापूर: (राहुल शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) पेठ वडगाव शहराच्या वैद्यकीय सहकार क्षेत्रात भरीव योगदान दिलेले डॉ. अण्णासाहेब चौगुले यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त आधारवड या त्यांच्या स्मृती स्थळ परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आदरांजली वाहिली.
डॉ. अण्णासाहेब चौगुले हे पेठ वडगाव शहरातील पहिले एमबीबीएस डॉक्टर होते. सर्वसामान्यांना माफक दरात उपचार देणारे डॉक्टर अशी त्यांची ख्याती होती. डॉ. चौगुले यांच्या स्मृती जतन करण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी कोल्हापूर रोडवरील चौगुले फार्म येथे आधारवड हे स्मृतिस्थळ उभारले आहे. डॉ. अण्णासाहेब चौगुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त खासदार धैर्यशील माने, आमदार राजू आवळे, नगराध्यक्ष मोहनलाल माळी, उपनगराध्यक्ष कालिदास धनवडे, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण यादव, अशोकराव माने, सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, डॉ. मिलिंद हिरवे, डॉ. शिंगे, गुलाबराव पोळ, विजयादेवी यादव, प्रविता सालपे, अजय थोरात, सुनिता पोळ, संतोष गाताडे, संतोष चव्हाण, डॉ ओजस हंचनाळे, सुधाकर पिसे राहुल शिंदे, राजू वायदंडे, दिगंबर पोळ यांच्यासह विविध मान्यवरांनी आदरांजली वाहिली.