• Home
  • डान्स शो साठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा महीनाभर संपर्कच तुटला

डान्स शो साठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा महीनाभर संपर्कच तुटला

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210103-WA0008.jpg

डान्स शो साठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा महीनाभर संपर्कच तुटला

कोल्हापुर शहरातील एका अल्पवयीन मुलीला पुण्यातील डान्सग्रुपने शो साठी परराज्यात नेले होते. त्यानंतर तब्बल महिनाभर या मुलीशी कुटुंबाचा संपर्कच तुटला होता, त्यामुळे निराश झालेल्या कुंठुबीयानी कोल्हापुरातील स्वयंसेवी संस्था व जुना राजवाडा पोलीस यांच्या मदतीने उत्तर प्रदेशपर्यंत पाठपुरावा केल्याने त्या अल्पवयीन मुलीची कुटुंबाशी भेट झाली. मुलीच्या आईने उत्तर प्रदेशमध्ये जाऊन मुलीला ताब्यात घेतल्यानंतर कुटुंबियांचा जीव भांड्यात पडला.
पुण्यातील एका डान्स कंपनीच्या व्यक्तीने कोल्हापुर मधील अल्पवयीन मुलीला दिनांक २३ नोंव्हेबर २०२० रोजी डान्सच्या नावाखाली पुण्याला नेले. तेथे नृत्याचे कार्यक्रम झाले.
त्यानंतर औरंगाबाद, नागपूर, जिल्ह्यातही अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले. त्यानंतर या ग्रुपने त्या मुलीला उत्तर प्रदेशमधील इलाहाबाद येथे नेले. पण यादरम्यान तिचा कुटुंबियांशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे मुलीची आई कासावीस झाली, विविध शंकांनी हैराण झालेल्या मुलीच्या आईने छत्रपती राजर्षी शाहू कृष्णानंद सेवाभावी संस्थेच्या नंदा जगदाळे यांच्याशी संपर्क साधून सविस्तर माहिती सांगितली. नंदा जगदाळे यांनी पोलिसांच्या टोल फ्री नंबरवर तक्रार नोंदवली. जुना राजवाडा पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. पोलिसांनी ग्रुपच्या प्रमुखाला फोनवरुन संपर्क साधून मुलीला उत्तरप्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्याचे बजावले. त्यानंतर ग्रूप प्रमुखाने संबंधित मुलीला तेथील पोलिसांच्या ताब्यात दिले.
यु.पी.मधील बालकल्याण समितीच्या शीला यादव यांनी मुलीचा योग्यरित्या सांभाळ केला. त्यानंतर तब्बल एका महिन्याने मुलीच्या आईने उत्तरप्रदेश गाठत तेथे मुलीचा ताबा घेतला. जुना राजवाडा पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे मुलीचा तातडीने शोध लागला.

युवा मराठा न्यूज .

anews Banner

Leave A Comment