Home कोल्हापूर इचलकरंजीत अनधिकृत नळजोडणी केलेल्यांवर ५ ते १५ हजार रूपये दंड

इचलकरंजीत अनधिकृत नळजोडणी केलेल्यांवर ५ ते १५ हजार रूपये दंड

94
0

राजेंद्र पाटील राऊत

इचलकरंजीत अनधिकृत नळजोडणी केलेल्यांवर ५ ते १५ हजार रूपये दंड

कोल्हापूर : इचलकरंजी शहरातील अनधिकृत नळजोडणी केलेल्यांवर ५ ते १५ हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असा निर्णय इचलकरंजी नगरपालिकेने घेतला आहे. अनधिकृत नळजोडणी केलेल्यांनी तातडीने जोडणी अधिकृत करून घ्यावी, असे आवाहन पाणीपुरवठ्याचे पालिका सभापती श्री . विठ्ठल चोपडे यांनी केले आहे. अभय योजनेनुसार ज्यांची जोडणी अनधिकृत आहे ,पण नियमित करण्याची इच्छा आहे, अशा नागरिकांनी एक हजार रुपये व एक वर्षाची पाणीपट्टी भरून मार्च २०२१ पर्यंत त्यांची जोडणी नियमित करू शकतील. तसेच ज्यांच्याकडे नळजोडणी नाही, त्यांनी १०० रुपये व मार्च २०२१ पर्यंत तीन महिन्यांची पाणीपट्टी भरून नवीन नळजोडणी घेता येईल. इचलकरंजी शहरातील नागरिकांना ही संधी जून २०२१ पर्यंत दिली आहे.
अनधिकृत नळ जोडणी वापरणे हा गुन्हा असल्याने ही कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा, असेही यावेळी सभापती श्री. विठ्ठल चोपडे यांनी सांगितले.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleअँक्ट २०२० असा नवीन प्रस्तावित कायद्या येणार , केंद्रीय आरोग्य मंत्रालय
Next articleडान्स शो साठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा महीनाभर संपर्कच तुटला
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here