• Home
  • दत्त जयंती निमित्त वडगांवात विश्वशांतीसाठी महामृत्युंजय यज्ञ

दत्त जयंती निमित्त वडगांवात विश्वशांतीसाठी महामृत्युंजय यज्ञ

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201226-WA0120.jpg

दत्त जयंती निमित्त वडगांवात विश्वशांतीसाठी महामृत्युंजय यज्ञ

वडगांव : वडगांव शहरातील दत्तनगर येथील
श्री. दत्तगुरु स्वामी समर्थ मंदिर येथे दिनांक २७/१२/ २०२० रोजी दत्तनगर मधिल श्री. दत्तगुरु स्वामी समर्थ धार्मिक व धर्मादाय ट्रस्ट यांच्या वतीने विश्वशांतीसाठी महामृत्युंजय लघु ऋद्र व स्वामी समर्थ दत्त गुरूना दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाप्रसादाचा कार्यक्रम पुर्णपणे रद्द करण्यात आला आहे.
तरी दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांनी मास्कचा वापर करावा व सोशल डिस्टन्स चे नियम पाळून फक्त तीर्थ प्रसादाचा लाभ घेता येणार आहे.
तसेच मंगळवार दिनांक २९ रोजी दत्त जयंती दिवशी सायंकाळी पाच वाजता होणारा जन्मकाळ कार्यक्रम हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे काटेकोरपणे पालन करून साजरा करण्यात येणार आहे. तरी याचा सर्व श्री.दत्तगुरु स्वामी समर्थ भक्तांनी लाभ घ्यावयाचा आहे .असे आवाहन श्री दत्तगुरु स्वामी समर्थ धार्मिक व धर्मादाय ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले आहे.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment