Home Breaking News दत्त जयंती निमित्त वडगांवमध्ये विश्वशांतीसाठी महामृत्युंजय यज्ञ

दत्त जयंती निमित्त वडगांवमध्ये विश्वशांतीसाठी महामृत्युंजय यज्ञ

197

 

वडगांव : वडगांव शहरातील दत्तनगर येथील
श्री. दत्तगुरु स्वामी समर्थ मंदिर येथे दिनांक २७/१२/ २०२० रोजी दत्तनगर मधिल श्री. दत्तगुरु स्वामी समर्थ धार्मिक व धर्मादाय ट्रस्ट यांच्या वतीने विश्वशांतीसाठी महामृत्युंजय लघु ऋद्र व स्वामी समर्थ दत्त गुरूना दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाप्रसादाचा कार्यक्रम पुर्णपणे रद्द करण्यात आला आहे.
तरी दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांनी मास्कचा वापर करावा व सोशल डिस्टन्स चे नियम पाळून फक्त तीर्थ प्रसादाचा लाभ घेता येणार आहे.
तसेच मंगळवार दिनांक २९ रोजी दत्त जयंती दिवशी सायंकाळी पाच वाजता होणारा जन्मकाळ कार्यक्रम हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे काटेकोरपणे पालन करून साजरा करण्यात येणार आहे. तरी याचा सर्व श्री.दत्तगुरु स्वामी समर्थ भक्तांनी लाभ घ्यावयाचा आहे .असे आवाहन श्री दत्तगुरु स्वामी समर्थ धार्मिक व धर्मादाय ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले आहे.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleवडगांव शहरातील दत्तनगर मधील ओढाच (नाला) गायब
Next articleदत्त जयंती निमित्त वडगांवात विश्वशांतीसाठी महामृत्युंजय यज्ञ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.