Home विदर्भ लिंगभेदाविरुद्ध जनजागृतीत नागरिकांनीही सहभागी व्हावे – मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार

लिंगभेदाविरुद्ध जनजागृतीत नागरिकांनीही सहभागी व्हावे – मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार

118
0

राजेंद्र पाटील राऊत

लिंगभेदाविरुद्ध जनजागृतीत नागरिकांनीही सहभागी व्हावे – मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार
अकोला( सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): मुलींच्या जन्माचे स्वागत करणे हा स्तुत्य उपक्रम आहे. मुलींना समानतेची वागणूक मिळावी यासाठी लिंगभेदा विरोधात जनजागृती मोहिम प्रभावीपणे राबवणे आवश्यक आहे, या मोहिमेत नागरिकांनीही सहभाग व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी केले.
जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या सभागृहात कन्यादिन उत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार हे अध्यक्षस्थानी होते. या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोखरे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना पटोकार-वसो, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. आरती कुलवाल, बालरोग तज्ज्ञ डॉ. साधवानी, मनपाच्या सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. अस्मिता पाठक, शुभांगी ठाकरे आदी उपस्थित होते.
कन्यादिन उत्सव कार्यक्रमात सौरभ कटीयार म्हणाले की, समाजात होत असलेले गर्भावस्थेतील लिंग निदानाचे प्रकार निंदनीय आहेत. अशा घटनाना आळा घालण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्यानुसार कडक कार्यवाही करा. आज महिला सर्वच क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहे. त्यातच कोरोना काळात महिला डॉक्टर व नर्सने केलेले कार्य असाधारण आहे. आज जिल्ह्यातील महत्वाच्या प्रशासकीय पदाचा धुरा महिलाच्या हातात आहे. ही अभिमानाची बाब आहे, असे गौरोवद्गार त्यांनी व्यक्त केले.
गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रे(लिंग निवडीस प्रतिबंध) कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे राबवावी. याकरीता स्टिंग ऑपरेशन, सोनोग्राफी सेंटर्सची अचानक तपासणी व जनजागृती अभियान यासारखे उपक्रम राबविण्याचे सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी यावेळी दिले.
कार्यक्रमात सुरुवातीला नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी गर्भजल लिंग निदान प्रतिबंधक कायद्याबाबत जनजागृतीपर पथनाट्य सादर केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिल्हा स्त्री रुग्णालयातील माता व नवजात बालिकांना बेबी किट व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मनिषा बंड तर आभार प्रदर्शन नम्रता हुमने यांनी केले.

Previous articleचिंचवे गावाजवळ भीषण अपघात
Next articleपोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या विरोधात केंद्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार ? : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here