Home रत्नागिरी मालगुंड येथे दहीकाला उत्सव जल्लोषात गोपाळकृष्ण व कुणबी समाज गोविंदा पथकांनी फोडल्या...

मालगुंड येथे दहीकाला उत्सव जल्लोषात गोपाळकृष्ण व कुणबी समाज गोविंदा पथकांनी फोडल्या दहीहंड्या!

67
0

आशाताई बच्छाव

IMG-20220820-WA0014.jpg

मालगुंड येथे दहीकाला उत्सव जल्लोषात गोपाळकृष्ण व कुणबी समाज गोविंदा पथकांनी फोडल्या दहीहंड्या!

रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) तालुक्यातील मालगुंड येथील श्री गोपाळकृष्ण मंदिर ट्रस्टच्यावतीने श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहीकाला उत्सव मोठ्या जल्लोषात व उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने गुरूवारी १८ रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त गोपाळकृष्ण मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर दहीकाला उत्सव आज शुक्रवारी 19 रोजी मोठ्या जल्लोषी वातावरणात वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी श्री गोपाळकृष्ण गोविंद पथकाने मालगुंड बाजारपेठेत लावलेल्या 30 ते 40 उंच थरावरील दहीहंड्या फोडण्याचा मान पटकावला. त्यांचेसमवेत मालगुंड येथील कुणबी समाज गोविंदा पथकानेही दहीहंड्या फोडण्यासाठी सहभाग घेऊन आपला मोठा उत्साह दाखविला.

एकूणच कोरोनाच्या गेल्या दोन वर्षांमुळे हा उत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात होऊ शकला नव्हता, त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात स्थानिक ग्रामस्थांनी गर्दी केली होती. या दहीकाला उत्सवात बैलगाड्यांमधून सजवलेले आकर्षक चित्ररथ लक्षवेधी ठरले होते. यावेळी या दहीकाल्यात मालगुंड भंडारवाड्यातील बालगोपाळांच्या श्रीकृष्ण काळातील विविध वेशभूषा खास सजवलेल्या बैलगाड्यातून दाखविण्यात आल्या होत्या. या दहीकाला उत्सवाचे व दहीहंड्याचे अतिशय नियोजनबद्ध आयोजन करून श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहीकाला उत्सव पार पाडण्यात आला.

यावेळी या मंडळाचे अध्यक्ष भूषणशेठ मयेकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्रमुख पदाधिकारी व गोपाळकृष्ण गोविंद पथकाच्या सदस्यांनी मोठी मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here