Home कोल्हापूर आ.अशिष शेलार यांचे इ.पूर वि.सभा भाजपा वतीने स्वागत

आ.अशिष शेलार यांचे इ.पूर वि.सभा भाजपा वतीने स्वागत

107
0

राजेंद्र पाटील राऊत

आ.अशिष शेलार यांचे इ.पूर वि.सभा भाजपा वतीने स्वागत

सांगली : (इस्लामपूर)भारतीय जनता किसान मोर्चा आयोजीत किसान आत्मनिर्भर यात्रेचा शुभारंभ आ.अशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थित आज इस्लामपुर विधानसभा मतदार संघातील येडेमच्छिंद्र येथुन होत आहे. यावेळी इस्लामपुर विधानसभा मतदार संघात आ.अशिष शेलारसाहेब यांचे स्वागत सर्वप्रथम उरूण – इस्लामपुर नगरपरीषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील (दादा) यांचे हस्ते इस्लामपुर विधानसभा भाजपाच्या वतीने करण्यात आले.
यावेळी इस्लामपुर विधानसभा मतदार संघातील भाजपा बांधणीचे आ.शेलारसाहेबांनी कौतुक केले,गेल्या तीन – चार वर्षात या मतदार संघात भाजपा विचाराच्या नागरीकांचे संघटन हे भाजपाची ताकत वाढविणारे असुन,समाजकारण,शिक्षण,आरोग्य व राजकारणातील काम आदर्श असल्याचे सांगत कोरोना काळात प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरने केलेले काम हे रुग्ण व नातेवाईकांना धीर व आधार देणारे ठरले असल्याचे सुतोवाच आ.शेलार यांनी या भेटीच्या संवादावेळी केले.
गत नगरपालिका निवडणुक व विधानसभा निवडणुकीतील मताधिक्याचा आढावा घेऊन इस्लामपुर नगरपालिका सत्तांतरानंतर रखडलेल्या अनेक योजना व विकास कामे मार्गी लावल्याबद्दल निशिकांतदादांचे कौतुक केले.यापुढे भाजपा पक्ष वाढविण्यासाठी लागेल ती मदत करू व पदाधिकारी,कार्यकर्ते यांना ताकत दिली जाईल असे यावेळी भेटी दरम्यान सांगितले.
यावेळी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख (बाबा),आमदार गोपीचंद पडळकर,माजी आमदार भगवानराव साळुंखे (आप्पा) ,
भाजपा युवा मोर्चाचे सांगली जिल्हा अध्यक्ष रोहीत पाटील,संदीप पाटील आदि सह अन्य भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

Previous articleदत्त जयंती निमित्त वडगांवात विश्वशांतीसाठी महामृत्युंजय यज्ञ
Next articleप.कोडोली गावचे पैलवान यश पाटील यांना कुस्ती खेळासाठी मानधन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here