Home बुलढाणा माजी कॅबिनेट मंत्री डॉ.संजय कुटे यांना पुन्हा मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता

माजी कॅबिनेट मंत्री डॉ.संजय कुटे यांना पुन्हा मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता

76
0

आशाताई बच्छाव

IMG-20220627-WA0007.jpg

माजी कॅबिनेट मंत्री डॉ.संजय कुटे यांना पुन्हा मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता

युवा मराठा न्युज, रवि शिरस्कार संग्रामपुर

एकनाथ शिंदे नेतृत्वात शिवसेनेचे आमदार व मंत्री सद्या गुवाहाटीत जाऊन बसल्याने राज्यातील सरकार अस्थीर झाले. राष्ट्रपती राजवट किंवा त्यामुळे सरकार कधीही बरखास्त होऊन नवीन सरकारचा कधीही नवा शपथविधी होऊ शकतो अशी एकूणच परीस्थीती निर्माण झाली आहे. त्यामुळे येणारे सरकार हे सेनेचे बंडखोर आमदार व भाजपा युतीचे असेल यात आता शंका उरली नाही. तसे झालेच तर गेल्या सात दिवसा पासुन सेना आमदारांची बंडखोरी हाताळणे व त्यावर पाहीजे तसे आयुर्वेदीक लायबल उपचार करणारे माजी मंत्री आ. डॉ. संजय कुटे यांचेसह जळगाव जा. मतदार संघाला अच्छे दिन येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर सत्ता पालट होऊन भाजपा व बंडखोर सेना आमदारांच्या युतीचे सरकार राज्यात आलेच तर आ. डॉ. संजय कुटेंना कॅबीनेट मंत्री पदाचे मोठे गिफ्ट नक्कीच मिळणार अशी चर्चा सर्वत्र मतदार संघाकडून होत आहे. प्रथम सुरतमधे मुक्कामी असलेल्या सेनेच्या आमदारांशी चर्चा करण्यासाठी प्रदेश भाजपाने आ. डॉ. कुटे यांनाच प्रथम हवाई मार्गे तातडीने पाठवले होते. त्यानंतर सध्या गुवाहाटीत असलेल्या बंडखोर आमदारांच्या संपर्कात भाजपाचे सर्वच बडे नेते आहेत.
यातही आ. डॉ. संजुभाऊ आघाडीवर आहेत. जर का समजा भाजपा व हे सेनेचे बंडोबा आमदार यांचे मिळून सरकार स्थापन झालेच तर आ. डॉ. संजय कुटेंचे नाव शपथ विधीत पहिल्या पाच मधेच असणार हे आता कोणीही नाकारू शकत नाही. मागील वेळी ते फक्त सहा महिने मंत्री राहुन गेले असले तरी आता मात्र पूर्ण अडीच वर्षाचा कालावधी मिळणार असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे जळगाव जा. मतदार संघासह आ.डॉ. संजय कुटेना मंत्रिपद नक्कीच मिळणार असल्याची असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

Previous articleस्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांच्या सह २५ आंदोलकांना जळगाव न्यायालयाकडुन जामिन मंजुर..!
Next articleहिरकणी ग्रुप कडून वारकऱ्यांना खाऊ वाटप
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here