Home बुलढाणा स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांच्या सह २५ आंदोलकांना जळगाव न्यायालयाकडुन जामिन मंजुर..!

स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांच्या सह २५ आंदोलकांना जळगाव न्यायालयाकडुन जामिन मंजुर..!

47
0

आशाताई बच्छाव

IMG-20220628-WA0036.jpg

स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांच्या सह २५ आंदोलकांना जळगाव न्यायालयाकडुन जामिन मंजुर..!                                                           संग्रामपूर/रविंद्र शिरस्कार युवा मराठा न्युज
जळगाव/शेतकऱ्यांच्या हक्काचे ६४ कोटी पिक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळेपर्यंत रिलायन्स कंपनीच्या विरोधात वेळोवेळी केलेल्या आंदोलनातुन दाखल झालेल्या गुन्ह्यातील प्रशांत डिक्कर यांच्या सह २५ आंदोलकांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. मागिलवर्षी पिक विमा प्रश्नावर आंदोलनाची धार कायम ठेवत स्वाभिमानीने सतत संघर्ष चालुच ठेवला. आणि तालुक्याच्या तहसील कार्यालयापासुन ते मुंबई मंत्रालय पर्यंत आणि शेवट कृषी आयुक्त पुणे कार्यालयासह ठिकाणी वेळोवेळी आंदोलने करुन विमा कंपनीला ६४ कोटी विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यास भाग पाडले हि वस्तुस्थिती आहे. जळगाव मतदार संघातील ५५ हजार दोनशे शेतकऱ्यांना सोयाबीनचा पिक विमा मिळवुन देण्यासाठी आंदोलनांच्या माध्यमातून कंपनी व प्रशासनाच्या विरोधात उपोषण, मोर्चे, मेळावे आंदोलने केल्याने शेकडो आंदोलकांवर विविध कलमान्वे गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील एका मेळाव्यामधे पोलिसांनी २९ आंदोलकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे १५ जुन रोजी २९ आंदोलकांना न्यायालयाने समन्स बजावुन २७ जुन रोजी जळगाव न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले‌. जळगाव न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी श्री एस एच बेलेकर यांनी हजर झालेल्या आंदोलकांना प्रत्येकी १५ हजाराच्या जात मुचलक्यावर २६ आंदोलकांची सुटका केली असुन, यावेळी नामांकित वकील ॲड रुपेश विश्वकर यांनी पक्षकारांच्या वतीने काम पाहिले. यामधे स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर,रोशन देशमुख,सुपेश वाघ,मोहन गांवडे,नानाराव वाघ,महादेव वाघ, विनोद करांगळे,विजय वाघ,नरेंद्र वाघ,प्रमोद करांगळे,दिनेश वाघ,प्रकाश वाघ, भिमराव तिजारे,राजेंद्र वाघ,शुभम वाघ,सागर वाघ, मंगेश वाघ, विनोद पान्हेरकर,सहदेव सातव,सचिन वाघ,मयुर गायकी, देविदास पान्हेरकर,अंनता पान्हेरकर,अक्षय वाघ,सुनिल वानखडे,अंनता गायकी उपस्थित होते.

Previous articleराजकीय बंडखोरीच्या सत्तासंघर्षाची साप्ताहिक सप्तरंगी रंगीत तालीम
Next articleमाजी कॅबिनेट मंत्री डॉ.संजय कुटे यांना पुन्हा मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here