Home नांदेड सन्मान निधीच्या तक्रारी सोडविण्यासाठी सज्जानिहाय कॅम्प घ्या-शिवशंकर पा.कलंबरकर

सन्मान निधीच्या तक्रारी सोडविण्यासाठी सज्जानिहाय कॅम्प घ्या-शिवशंकर पा.कलंबरकर

227

राजेंद्र पाटील राऊत

सन्मान निधीच्या तक्रारी सोडविण्यासाठी सज्जानिहाय कॅम्प घ्या-शिवशंकर पा.कलंबरकर

नांदेड,/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क

सरकारने शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान निधी अंतर्गत 2000 रुपयांचा हप्ता वर्षातून तीनवेळा देणारी योजना 2018 पासून सुरू केली आहे.या योजनेसाठी पात्र असून देखील आजप्रयन्त एकही हप्ता न मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या मुखेड तालुक्यात खूप मोठी आहे.या पात्र असून देखील वंचित असलेल्या शेतकऱ्यांना,या योजनेचा लाभ मिळवून दिला पाहिजे.शेतकरी सन्मान निधीच्या लाभासाठी सारख्या प्रशासनाकडे चकरा मारत आहे.अनेक शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.या तक्रारी निकाली निघाल्या पाहिजेत.शेतकऱ्यांच्या सन्मान निधीच्या (दोन हजार रुपयाचा हप्ता) तक्रारी सोडवण्यासाठी तालुक्यात सज्जानिहाय कॅम्प घ्या,अशी मागणी तहसीलदार काशीनाथ पाटील यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी निवेदनातून केली आहे.
सन्मान निधीसाठी पात्र असून लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांसोबत इतर अन्य तक्रारी आहेत.नावात व खाते नंबरमध्ये झालेली चूक,यामुळे एका व्यक्तीचे पैसे दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात जमा झाले.काहींना एक दोन हप्ते जमा झाले नंतर हप्ते बंद झाले.अशा अडचणी असलेल्या शेतकऱ्यांची संख्या खूप मोठी आहे.या वंचित असलेल्या लाभधारकांना लाभ मिळवून देण्यासाठी तालुक्यात सज्जानिहाय कॅम्प घेऊन हे प्रश्न सोडवले पाहिजेत.(दोन हजार रुपयाचा हप्ता) सन्मान निधीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांमध्ये याबद्दल तिव्र संताप आहे,असा निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे.

Previous articleअवैध रित्या रेतीची वाहतूक करतांना अधिकाऱ्यांनी रेती माफियांच्या मुसक्या आवरीत केला ट्रॅक्टर जप्त.               
Next articleटी.के.आर.एच.विद्यालयात कोवीड प्रतिबंधक लसीकरण दुसर्‍या टप्प्यास प्रारंभ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.