Home कोल्हापूर नवीन कृषि कायद्याचा शेतकऱ्यांना कसलाही लाभ नाही , पालकमंत्री सतेज पाटील

नवीन कृषि कायद्याचा शेतकऱ्यांना कसलाही लाभ नाही , पालकमंत्री सतेज पाटील

104
0

राजेंद्र पाटील राऊत

नवीन कृषि कायद्याचा शेतकऱ्यांना कसलाही लाभ नाही , पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर : केद्रातील सरकारने लादलेल्या नव्या कृषी कायद्यातून शेतकर्‍यांचा कसलाही लाभ होणार नाही. अंबानी यांचे जिओ आस्थापन चालू झाल्यावर शासकीय बी.एस.एन.एल. संचार आस्थापन देशोधडीला लागले. तशीच अवस्था शेतकर्‍यांची या विधेयकामुळे होणार आहे. इचलकरंजी मधील कापड व्यापारी दिवाळे काढून वारंवार पळून जात आहैत, तसेच शेतकरी कायद्यामुळे कार्पोरेट आस्थापन पळून जाण्याचा धोका आहे. त्यामुळे या कायद्याला विरोध करण्यासाठी काँग्रेस उद्याच्या देशव्यापी बंदला पाठिंबा देणार आहे, असे राज्याचे गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत सांगितले .
स्वातंत्र्यानंतर दीर्घकाळ राज्य केलेल्या काँग्रेसने त्या त्या वेळी शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवले असते, तर शेतकर्‍यांवर आंदोलन करण्याची वेळ आलीच नसती !
काँग्रेसने आपण शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवण्यात कोठे अल्प पडलो हे जनतेसमोर मांडले असते, तर त्या चुका आता सुधारता आल्या असत्या, असेच जनता आणि शेतकरी यांना वाटते.
सतेज पाटील पुढे म्हणाले की, केंद्रातील सरकार नव्या कृषी विधेयकाच्या माध्यमातून शेतकर्‍यांचे हित साधणार आहे, असे भाजपच्या नेत्यांनी गळ्यात पक्षाचा मफलर घालून शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन सांगण्याची धैर्य दाखवावे. त्यावर शेतकरी त्यांना योग्य ते उत्तर देतील. भाजप हा पक्ष शेतकरी विरोधी असल्याचे सातत्याने दिसून आले आहे.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleकौळाणे-व-हाणे पत्रकार भवन जागाप्रश्नी चौकशी अहवालाच्या गुलदस्त्यात दडलंय काय…?*
Next articleआशा वर्कर्सांच्या सेवा समाप्तीचे आदेश मागे , ग्रामाविकासमंत्री मुश्रीफ
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here