Home नाशिक मालेगाव  मेंढपाळांसाठी सामूहिक वन दावे मंजूर करण्याची मागणी

मालेगाव  मेंढपाळांसाठी सामूहिक वन दावे मंजूर करण्याची मागणी

119
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230703-211755_WhatsApp.jpg

मालेगाव  मेंढपाळांसाठी सामूहिक वन दावे मंजूर करण्याची मागणी
मालेगाव,(निंबा जाधव)- वन हक्क कायदा कलम २ नुसार
धनगर जमात अनुसूचित जमाती मध्ये नमूद केल्यानुसार मेंढ्या चरायसाठी सार्वजनिक वन हक्क दावे ज्या त्या क्षेत्रात मेंढपाळ असतील त्यांना सामूहिक वनदावे सदर कायद्यानुसार दाखल करण्याची मागणी मालेगाव तालुक्यातील तसेच धुळे जिल्ह्यातील समाज बांधवांनी वन हक्क समितीचे अध्यक्ष, उपविभागीय अधिकारी तथा प्रांत मालेगाव यांना यावेळी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. कारण दरवर्षी मेंढपाळ बांधव हे आठ महिने बाहेरून मेंढी चराई करून गावी आल्यानंतर त्यांना पावसाळ्यामध्ये मेंढ्यांचा तळ देण्यासाठी जागा उपलब्ध नसते व मेहंदी व गुरे यांचे अतोनात हाल होतात. सदर वन हक्क कायद्यात कलम दोन मध्ये तरतूद केल्यानुसार धनगर समाज ही अनुसूचित जमातीमध्ये येत असल्याचे नमुद असून त्यानुसार सामूहिक वनदावे दाखल व्हावे. सदर मेंढपाळ बांधवांच्या नावे कायमस्वरूपी वनपट्टे देण्याबाबतची मागणी करण्यात आली यावेळी उपविभागीय अधिकारी तथाप्रांत अधिकारी मालेगाव यांनी शिष्टमंडळाला याबाबत सामूहिक वन हक्क दावे दाखल करण्याबाबत सूचित केले व सदर कायद्यानुसार सविस्तर चौकशी करून पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा वन हक्क समिती तथा जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे सदर दावे पाठवण्याबाबत आश्वासित केले. कारण हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात उद्भवला असून दरवर्षी पावसाळ्यात त्याची जास्त गरज असते.
यावेळी श्री. नितीन सदगीर, उपविभागीय अधिकारी मालेगाव व श्री.हिरे साहेब उपविभागीय वन अधिकारी मालेगाव ,यांना निवेदन देण्यात आले. यावेळी
श्री. आर. पी. कुवर(रावसाहेब), तळवाडे येथील माजी सरपंच समाधान शिरोळे, सामाजिक कार्यकर्ते निंबा भाऊ जाधव, श्री मनोज भाऊ देशमुख, आबा नंदाळे, नितीन भाऊ बच्छाव, सुरेश गवळी, शंकर पानसरे, रावजी जाधव ,येसू कांदळकर, समाधान जाधव, जगन जाधव, आत्माराम लांडगे, केदा जाधव, अनिल जाधव, धुळे येथील आबा बोरकर इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.

Previous articleआ. रणजीतसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाभार्थी संमेलन उत्साहात
Next articleजय मल्हार क्रांती संघटनेचे राज्यस्तरीय चर्चासत्र संपन्न       
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here