Home पुणे जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्यस्तरीय चर्चासत्र संपन्न       

जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्यस्तरीय चर्चासत्र संपन्न       

50
0

आशाताई बच्छाव

IMG-20230703-WA0026.jpg

जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्यस्तरीय चर्चासत्र संपन्न                                                     पुणे,(प्रतिनिधी मयुर चव्हाण)-जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित काल दिनांक 2 जुलै रोजी पिंपरी चिंचवड येथे रामोशी बेरड बेडर समाजातील अधिकारी वर्ग, नोकरदार वर्ग, व्यवसाय वर्ग यांचा राज्यस्तरीय चर्चासत्र संपन्न झाले.

यावेळी राज्यातील सुमारे 400 हून अधिक अधिकारी वर्ग नोकरदार वर्ग व्यवसाय वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता प्रत्येक अधिकारी वर्गाने या कार्यक्रमाचे स्वागत केले व येणाऱ्या काळामध्ये समाजाला लागेल ते सर्व सहकार्य करण्याची गव्ही देण्यात आली. कार्यक्रम नोकरदार अधिकारी वर्ग यांचा असल्यामुळे व्यासपीठावर फक्त अधिकारी नोकरदार व्यवसायिक वर्ग बैठक व्यवस्था करण्यात आली होती.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री.दौलतनाना शितोळे साहेब उपाध्यक्ष आदरणीय श्री अंकुशराव जाधव सर यांच्यासहित संघटनेचे उपस्थित असणारे पदाधिकारी अधिकारी नोकरदार व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, तसेच या कार्यक्रमाला उपस्थित न राहता आलेले अधिकारी वर्ग यांनी आपल्या मोबाईल वरून व्हॉइस संदेश तसेच व्हिडिओ द्वारा संदेश देण्यात आला, पुढील काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अधिकारी नोकरदार वर्ग यांच्या माध्यमातून रामोशी बेरड बेडर समाजातील येणाऱ्या नव्या पिढीला योग्य मार्गदर्शन करून मुख्य प्रवाहत आणण्यासाठी ही मंडळी प्रामुख्याने सहभागी होणार असल्याचे या कार्यक्रमात संपन्न झाले.
यावेळी
कार्यक्रमाचे अध्यक्ष.डॉक्टर पी. एल. खंडागळे साहेब( सचिव राज्य सहकारी निवडणूक प्राधि. म. रा.)
कार्यक्रमाचे उद्घाटक मा कुमारी कांचन ताई जयवंतराव खोमणे मॅडम (न्यायाधीश )
मा. श्री. मा जयंत नाईक साहेब( सह कर निर्धारक म. रा.)
मा. श्री.शिवमुर्ती नाईक साहेब( मा. आयुक्त मीरा भाईंदर )
मा.सै. भाग्यश्री ताई भडलकर( नगर रचनाकार खोपोली )
मा. श्री. सुरेश नाईक साहेब( अप्पर सचिव महसूल )
मा. श्री.भीमराज मंडले साहेब( महा डी वाय एस पी )
मा. श्री.चंद्रकांत अडके साहेब( मा.नगर सचिव सांगली )
मा. श्री.अशोक बोडरे साहेब( मा. विक्रीकर अधिकारी )
मा. श्री.राजेंद्र चव्हाण साहेब (उपअधीक्षक भूमि अभिलेख )
मा. श्री.रामदास आबा धनवटे( अध्यक्ष कोअर कमिटी म. रा.)
मा. श्री.संतोष जाधव सर( अध्यक्ष निर्माण संस्था)
या.श्री.सुभाष चव्हाण साहेब
(मा.पी.आय. भिवंडी ठाणे)
मा. सौ. आशाताई चव्हाण
मा. श्री. दादासाहेब मदने
मा. श्री. सुभाष दादा मदने
मा श्री हनुमंत भांडवलकर सर ( अध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना नोकरदार आघाडी महाराष्ट्र राज्य )व
मा. श्री. नामदेवराव शेळके साहेब (उपाध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना नोकरदार आघाडी महाराष्ट्र राज्य) तसेच अधिक मान्यवर व नोकरदार वर्ग उपस्थित होता व जय मल्हार क्रांती संघटनेचे पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते

Previous articleमालेगाव  मेंढपाळांसाठी सामूहिक वन दावे मंजूर करण्याची मागणी
Next articleअंगणवाडी सेविका मदतनीस अर्ज भरण्याची तारीख वाढवावी.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here