Home नाशिक भाजयुमोच्या देवळा तालुकाध्यक्षपदी योगेश उर्फ नानू आहेर यांची निवड

भाजयुमोच्या देवळा तालुकाध्यक्षपदी योगेश उर्फ नानू आहेर यांची निवड

74
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220523-WA0030.jpg

     (भिला आहेर युवा मराठा न्युज नेटवर्क)
देवळा (तालुका प्रतिनिधी) :- भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या देवळा तालुकाध्यक्षपदी योगेश उर्फ नानू आहेर यांची निवड.
देवळा तालुका भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या देवळा तालुकाध्यक्षपदी येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश आहेर यांची तर भारतीय जनता पक्षाच्या तालुका सरचिटणीसपदी दिशांत देवरे यांची निवड करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण यांनी याबाबतचे नियुक्ती पत्र योगश आहेर व दिशांत देवरे यांना दिले.भारतीय जनता पक्षाबाबत असलेली त्यांची निष्ठा,सामाजिक कार्याची बांधिलकी,उत्तम प्रकारचे संघटन कौशल्य ह्या कार्याची दखल घेत त्यांना युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष पद दिल्याचे यावेळी किशोर चव्हाण यांनी सांगितले .योगेश आहेर हे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांचे अतिशय निकटवर्तीय असून योगेश आहेर व दिशांत देवरे यांच्या निवडीचे केदा आहेर यांनी स्वागत केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here