• Home
  • मराठा आरक्षणवर १५ जुलैला..! सर्वोच्च न्यायालय देणार अंतरिम आदेश…! 🛑 ✍️नवी दिल्ली :( विजय वसंत पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मराठा आरक्षणवर १५ जुलैला..! सर्वोच्च न्यायालय देणार अंतरिम आदेश…! 🛑 ✍️नवी दिल्ली :( विजय वसंत पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 मराठा आरक्षणवर १५ जुलैला..! सर्वोच्च न्यायालय देणार अंतरिम आदेश…! 🛑
✍️नवी दिल्ली 🙁 विजय वसंत पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नवी दिल्ली :⭕मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयात झालेली सुनावणी संपली असून आता अंतरिम आदेश देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने येत्या १५ जुलै रोजीची तारीख निश्चित केली आहे. त्यामुळे आता आरक्षणाच्या विरोधकांना आणि समर्थकांना देखील १५ जुलैपर्यंत आदेशांसाठी थांबावं लागणार आहे. आज झालेल्या सुनावणीमध्ये दोन्ही बाजूंचं म्हणणं सर्वोच्च न्यायालयाने ऐकून घेतलं असून आता न्यायालयाने वकिलांना त्यांचे मुद्दे लेखी सादर करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी दिली आहे.

अंतरिम सुनावणीसाठी होणाऱ्या सुनावणीवेळी ५ न्यायाधीशांकडे हे प्रकरण सोपवलं जावं का? याबद्दल आदेश येऊ शकतो. येत्या बुधवारी वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशावेळी आरक्षण दिलं जाणार की नाही, याचा निर्णय देण्यासाठी सुनावणी घेतली जाणार आहे. पण एकंदरीत आज आरक्षणावर कोणतीही स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने दिलेली नाही ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे.

⭕विनोद पाटील, याचिकाकर्ते.⭕

anews Banner

Leave A Comment