Home Breaking News *जय शिवराय किसान संघटनेच्या वतीने* *धरणे आंदोलन करण्याचा इशारा*

*जय शिवराय किसान संघटनेच्या वतीने* *धरणे आंदोलन करण्याचा इशारा*

165
0

*जय शिवराय किसान संघटनेच्या वतीने*
*धरणे आंदोलन करण्याचा इशारा*

*युवा मराठा न्यूज नेटवर्क*

वारणा सहकारी साखर कारखान्याने गेल्यावर्षीची माहे फेब्रुवारी 15 नंतरचे ऊस बिले अद्यापही शेतकऱ्यांना आदा केलेली नाहीत. यासाठी जय शिवराय किसान संघटना व आंदोलक अंकुश यांनी माननीय साखर आयुक्त पुणे यांच्याकडून वारणा कारखान्यावर जप्ती आदेशाचे कारवाई केली होती. त्याला अनुसरून आज जय शिवराय किसान संघटनेचे वतीने माननीय तहसीलदार पन्हाळा यांच्याकडे कारखान्यावरती जप्ती आदेश लागू करून शेतकऱ्यांची बिले आदा करावीत यासाठी मागणी करण्यात आली. यावेळी तहसीलदार शेंडगे साहेब यांनी कारखान्यास दुसरी नोटीस काढली असल्याचे सांगितले, तसेच या वेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक भगत साहेब यांनी बुधवार दिनांक 28 ऑक्टोबर पर्यंत थकीत सर्व एफ आर पी ची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याचे सांगितले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे कारवाई साठी आक्रमक पवित्रा घेतला. गुरुवार दिनांक 28 ऑक्टोबर पर्यंत जर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा नाही झाले, तर 29 ऑक्टोबर नंतर तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा जय शिवराया च्या वतीने देण्यात आला. यावेळी उपस्थित जय शिवरायचे किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने, पन्हाळा तालुका अध्यक्ष बंडा पाटील, हातकणंगले तालुका अध्यक्ष गब्बर पाटील, संघटनेचे उपाध्यक्ष शिवाजी शिंदे, सदाशिव कुलकर्णी काका, शितल कांबळे, उत्तम पाटील तात्या, राजेश पाटील, अमित गर्जे, चंद्रकांत माने, बजरंग अवघडे, धनपाल खोत, संभाजी हजारे आदींसह ऊस उत्पादक शेतकरी हजर होते.
*जिल्हा प्रतिनिधी कोल्हापूर .*

Previous article🛑 खडकवासला ग्रामीण भागात नुकत्याच झालेल्या वादळी पावसाने या भागातील शेतीचे .मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 🛑
Next article🛑 *पुण्याच्या गोल्डमॅनवर पत्नीला मारहाण करुन गर्भपात केल्याचा आरोप…! गुन्हा दाखल* 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here