Home जालना जाफराबाद तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेती मशागतीची कामे खोळंबली

जाफराबाद तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेती मशागतीची कामे खोळंबली

145

आशाताई बच्छाव

1001547764.jpg

जाफराबाद तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेती मशागतीची कामे खोळंबली

जाफराबाद जालना प्रतिनिधी – मुरलीधर डहाके

साविस्तर वृत्त असे की जाफराबाद तालुक्यात मागील दहा बारा दिवसांपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हा पाऊस सतत चालू असल्यामुळे शेतात वाफसा होत नाही. शेतकऱ्यांनी अजून शेतात मशागती न करता शेती नांगर करून ठेवली आहे.तर काही शेतकर्‍यांची नांगरनी बाकी आहे. पाऊस उघडण्याचे नावच घेत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.यावर्षी पावसाळ्यामध्ये खरिपाची पेरणी वेळेवर होणार असे भाकीत हवामान खात्याबरोबर अनेक तज्ञांकडूनही सांगण्यात येत होते.परंतु पाऊस हा जून महिन्यात होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. यामुळे शेतकरी वर्ग आनंदात होता शेतकरी मे महिन्यामध्ये आपल्या शेतीच्या मशागती करण्याच्या तयारीत होता. रब्बी पिकाची कामे उरकून वेळेत मशागती कश्या करता येईल यासाठी शेतकरी तयारीत होता, परंतु मे महिना सुरू होताच पहिल्याच आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.बदलत्या हवामानामुळे शेतीला मोठा फटका बसला आहे. अवेळी आलेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील आणि उन्हाळी पिकांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. जाफराबाद तालुक्यात सर्वच भागांत झालेल्या जोरदार पावसामुळे नांगरणी, मशागत काही ठिकाणी गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे उभ्या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. उन्हाळी हंगामावर देखील मोठा परिणाम झाला आहे.
तसेच काही जुने जाणकार शेतकरी सांगतात की मे महिन्यामध्ये असा पाऊस वीस विस पंचवीस वर्षे अगोदर झाला होता.