Home नांदेड “१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिमेअंतर्गत देगलुर कार्यालयाची प्रथम क्रमांकाने निवड, उपविभागीय अधिकारी...

“१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिमेअंतर्गत देगलुर कार्यालयाची प्रथम क्रमांकाने निवड, उपविभागीय अधिकारी अनुप पाटील यांना गौरव

179

आशाताई बच्छाव

1001548521.jpg

“१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिमेअंतर्गत देगलुर कार्यालयाची प्रथम क्रमांकाने निवड, उपविभागीय अधिकारी अनुप पाटील यांना गौरव”

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

छत्रपती संभाजीनगर, ३० मे २०२५ – छत्रपती संभाजीनगर विभागात दिनांक ०७ जानेवारी २०२५ ते ०२ मे २०२५ या कालावधीत राज्यशासनाच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या “१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम” मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या देगलुर उपविभागीय अधिकारी कार्यालयाची प्रथम क्रमांकाने निवड करण्यात आली आहे.

या शानदार कामगिरीबद्दल अनुप पाटील, उपविभागीय अधिकारी, देगलुर जि. नांदेड यांना छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित समारंभात गौरविण्यात आले. विभागीय आयुक्त मा. दिलीप गावडे यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांच्या आणि त्यांच्या टीमच्या उत्कृष्ट कार्याची प्रशंसा करण्यात आली.

“१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिम” अंतर्गत राज्यशासनाने विभागीय कार्यालयांमध्ये कार्यक्षमता, पारदर्शकता आणि लोककल्याणकारी सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी हे अभियान राबविले होते. यामध्ये देगलुर कार्यालयाने सर्वोत्तम कार्यप्रदर्शन केल्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला.

Previous articleजाफराबाद तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेती मशागतीची कामे खोळंबली
Next articleजागतिक तंबाखू नकार दिन : 31 मे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.