आशाताई बच्छाव
चोरीच्या मोटार सायकल बाळगणारा आरोपी दोन मोटार सायकल सह स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
जालना जिल्ह्यात मोटरसायकल चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे पोलीस अधीक्षक साहेबांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव यांना सूचना दिल्या की त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गणेश शाखा जालना यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मोटार सायकल चोरांचा शोध घेऊन त्यांचे वर कारवाई करण्याच्या सूचना देऊन मार्गदर्शन केले होते.
त्या अनुषंगाने दिनांक 29/05/ 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुप्त माहिती बातमीदार यांचे मार्फतीने माहिती मिळाली की इसम नामे सुरेश गंगाधर पवार रा. मेरखेडा ता. भोकरदन जि. जालना त्यांच्याकडे चोरीच्या मोटरसायकल पासून तो सध्या कृष्णा मॉलसमोर रस्त्याजवळ आहे. त्या अनुषंगाने सुरेश गंगाधर पवार रा.मेरखेडा तालुका भोकरदन जिल्हा जालना याचा शोध घेऊन त्या ताब्यात घेऊन त्याच्याकडे त्याच्या ताब्यातील मोटार सायकल बाबत विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली त्यामुळे त्याचे ताब्यातील होंडा शाईन व हीरो एच एफ डिलक्स अशा दोन मोटरसायकल जप्त केल्या त्यांची किंमत 1,10,000/- रूपये आहे. त्याचे विरुद्ध तालुका जालना पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर दोन्ही मोटरसायकल ची अधिक माहिती मिळवली असता सदरच्या दोन्ही मोटरसायकल या जवाहर नगर पोलीस ठाणे छत्रपती संभाजीनगर हद्दीतून चोरी झालेल्या असून जेव्हा नगर पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. 177/2025 कलम 303(2) भा.न्या.सं.व गु.र. क्र.395 /2024 कलम 303(2) भा.न्या.सं.अन्वये गून्हे दखल आहे.
सदाची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल, मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी ,मा. उपविभागीय पोलीस अधिकारी जालना श्री अनंत कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली श्री पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार रामप्रसाद पव्हरे, रमेश राठोड,प्रभाकर वाघ, गोपाल गोशिक, विजय डिक्कर,इरशाद पटेल ,संदीप चिंचोले, रमेश काळे, योगेश सहाने, सौरभ मुळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली आहे.






