Home वाशिम डीएपी खतांसोबतची नॅनो व सल्फर लिंकींग, कृषी सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांची फसवणूक

डीएपी खतांसोबतची नॅनो व सल्फर लिंकींग, कृषी सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांची फसवणूक

103

आशाताई बच्छाव

1001547748.jpg

डीएपी खतांसोबतची नॅनो व सल्फर लिंकींग, कृषी सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांची फसवणूक

लिकिंग थांबवा अन्यथा आंदोलन
राम इढोळे शेतकरी नेते यांचा इशारा
वाशिम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ –जिल्ह्यात डी.ए.पी. खतासोबत -नॅनो व सल्फर खताची लिंकिंग करून कृषी सेवा केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. ही फसवणूक थांबवा. अन्यथा शेतकरी नेते राम इढोळे यांचा वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी नेते राम इढोळे यांनी दिला. या संदर्भातील ईशारा, खरीप हंगाम २०२५ साठी जिल्हयातील शेतकरी बांधवं बी-बियाणे व रासायनिक खताच्या खरेदीसाठी खत विक्रेत्यांकडे जात आहे. वाशीम जिल्हयातील शेतकयांची डी.ए.पी खताला प्रथम पसंती असल्यामुळे शेतकऱ्याची गरज लक्षात घेवून वाशीम जिल्हयातील खतविक्रेत्यांनी गरजू शेतकऱ्याना डी.ए.पी. खत पाहीजे असेल तर तुम्हाला सल्फर खत किंवा नॅनो खत घ्यावेच लागेल. अशी जबरदस्ती सुरु केल्याची माहिती गरजू शेतकऱ्यांकडून प्राप्त आली आहे. आधिच नैसर्गिक व आर्थिक संकटांचा सामना करत जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत

सापडलला आहे. वाशीम जिल्हयातील सर्व गरजू शेतकऱ्याऱ्यांना खरीप हंगाम २०२५ साठी आवश्यक असलेल्या डी ए.पी खताचा साठा आपण शासनाकडून प्राप्त करुन द्यावा. तसेच कोणत्याही खत कंपनीने लिंकींगची जबरदस्ती करु नये. यासाठी सुध्दा आपण उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी नेते राम इढोळे यांचा वतीने करण्यात आली आहे.
यांच्यासह अनेक शेतकराची मागणी कळवीले आहे.