आशाताई बच्छाव
साक्री धुळे संदीप वसंतराव पाटील ब्युरो चीफ – ओम साई राम ग्रुप संघटना. आखाडे तालुका साक्री. जिल्हा धुळे.
तर्फे इयत्ता १० वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
व त्याच्या उज्वल भविष्यासाठी पुढील वाटचालीसाठी असेच यश मिळो व खुप प्रगती करतो अशा शुभेच्छा देण्यात आल्या…!
दहावी हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्प्यावरच आपल्या आयुष्याला एक दिशा मिळते. पुढील आयुष्याचं यश-अपयश, स्ट्रगल, व्यक्तीचे समाजातील स्थान हे पुढील प्रवेशावर अवलंबून असते,ओम साई राम ग्रुप संघटना आखाडे.हि नेहमीच समाज कार्यासाठी काम करत असुन संघटना हि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी नेहमीच कटिबद्ध असते व नेहमीच समाजकार्य ला नेहमीच पाठिंबा हा संघटना देत असते संघटने द्वारे इतर वेगवेगळे उपक्रम हे नेहमीच संघटने मार्फत राबविण्यात येत असतात…!
सर्व यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे संघटनेचे मार्गदर्शक प्रशांत दादा पाकळे यांनी कौतुक केले व पुढील भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सदर समारंभ समयी
संघटनेचे अध्यक्ष किरण पाकळे, वासुदेव बागुल, देवीदास बागुल, अमोल महाले,सागर मोरे,साहिल खाटीक, भुषण महाले, नन्या सासके, रोहित पवार,व विद्यार्थी उपस्थित होते.






