Home भंडारा समाधी ,संबोधी आणि सदाचार हेच बौद्ध धम्माच्या कुशल कर्माचे अधिष्ठान आहे

समाधी ,संबोधी आणि सदाचार हेच बौद्ध धम्माच्या कुशल कर्माचे अधिष्ठान आहे

86

आशाताई बच्छाव

1001547683.jpg

समाधी ,संबोधी आणि सदाचार हेच बौद्ध धम्माच्या कुशल कर्माचे अधिष्ठान आहे

श्रीलंका येथील भंतेजी शिवली बोधी

 

संजीव भांबोरे
भंडारा –लाखनी येथील महाप्रज्ञा बुद्ध विहार येथे मार्गदर्शन करताना शिवली बोधी श्रीलंका येथील परमपूज्य भंतेजी म्हणाले
की समाधी ,संबोधी ,आणि सदाचार हेच बौद्ध धम्माच्या कुशल कर्माचे अधिष्ठान असल्याचे सांगितले, पुढे ते म्हणाले की बौद्ध धर्म हा शाक्य कुलोत्पन्न तथागत गौतम बुद्ध यांनी स्थापन केला . मानवी जीवन सुखकर बनविण्यासाठी जो मध्यम मार्ग सांगितला नीतिमान जीवन जगण्यासाठी जी आचार संहिता सांगितली ती म्हणजे धम्म होय. तथागतांनी सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी वाराणसी जवळ सारनाथ येथील मनोगतय वनात सुरुवातीस त्यांची विरोधक असलेल्या पंचवर्गीय मन परिवर्तन करून त्यांच्यासमोर जे धम्मचक्र प्रवर्तन केले तेव्हापासून अव्याहतपणे बौद्ध धम्म पुढे संपूर्ण भारतभर आणि भारताबाहेरही पसरला आणि सर्वोच्च स्तरावरील लोकांनी त्यांचा उत्स्फूर्तपणे अंगीकार केला .बुद्ध ही व्यक्ती पूजत नव्हते अत्त दीप भव म्हणजे स्वयंप्रकाशित होऊन स्वतःच मार्ग अंगी करा असा त्यांनी उद्घोष केला धम्मामध्ये स्वर्ग,नरक, ,कर्मकांड, अंधश्रद्धा, पापपुण्य,नवस यांना थारा नाही बुद्धांनी आपले तत्वज्ञान हे पाली या भाषेतून लोकांना सांगितले हे तत्त्वज्ञान सोपे होते .यात कुठलाही अतिरेक नसून बुद्धांनी लोकांना मध्यम मार्ग सांगितला.याप्रसंगी सूत्रसंचालन गजेंद्र गजभिये आणि आभार डॉ रेवाराम खोब्रागडे यांनी केले.यावेळी सदानंद वासनिक, नामदेव कानेकर, युवराज भालाधारे जयंद्र मेश्राम, आशिष गणवीर, प्रज्ञा मेश्राम, सुमन कानेकर, साधना शिंगाडे, कमल गणवीर,सुमन राजवाडे, विना डोंगरे, विद्या डोंगरे,सीमा उके, शीला कोटांगले,रूपा रामटेके, संगीता तिरपुडे, मीरा रामटेके, ज्योती भैसारे,अस्मिता पाटील ,सायली ढवळे आणि शेकडो महिला उपस्थित होत्या.

Previous articleEXCLUSIVE ‘गांजाचा धूराळा !’ उदयनगरात 11 किलो गांजा हस्तगत ! – एका आरोपीसह 2 लाख 20 हजाराचा गांजा जप्त !
Next articleसन्मान द्या आणि सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमांतर्गत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.