Home बुलढाणा कलेक्टर म्हणाले.. ‘शेतकऱ्यांनो वेळ न दवडता पेरणीची तयारी करा !’

कलेक्टर म्हणाले.. ‘शेतकऱ्यांनो वेळ न दवडता पेरणीची तयारी करा !’

136

आशाताई बच्छाव

1001547660.jpg

कलेक्टर म्हणाले.. ‘शेतकऱ्यांनो वेळ न दवडता पेरणीची तयारी करा !’
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा खरीप हंगामाचे तीन महिने महत्त्वाचे आहेत. जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान 761 मिमी आहे. गतवर्षी 909 मिमी पाऊस झाला होता परंतु यंदा मे महिन्यातच रेकॉर्ड
ब्रेक 154 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागत करून वेळ न दवडता पेरणीची तयारी सुरू करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.
29 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. किरण पाटील पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांनी यावर्षी पारंपारिक पीक पद्धतीपेक्षा नाविन्यपूर्ण पीक पद्धती अवलंबवावी, सोयाबीन- कापूस पिकापेक्षा अन्य नाविन्यपूर्ण पिकांना प्राधान्य द्यावे, यावर्षी
सात लाख 41 हेक्टर वर कृषी विभागाने पिक लागवडीचे नियोजन केले आहे. जवळपास 50 टक्के सोयाबीन पीक अपेक्षित आहे. अतिवृष्टी व पूराचा धोका यावर बोलताना पाटील म्हणाले की, पुराचा धोका असलेल्या गावात किंवा नदीपात्रालगत अतिक्रमण करून राहू नये, प्रशासन काळजी घेतच आहे परंतु नागरिकांनी विशेष करून खबरदारी घ्यावी तसेच मे महिन्यात चार जणांचा वीज कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे विजे पासून बचाव करण्याकरिता आपल्या मोबाईल मध्ये दामिनी अॅप डाऊनलोड करा या अॅपच्या माध्यमातून उपाय योजना लक्षात घेऊन विजे पासून बचाव करता येईल. पुढे डॉ. पाटील म्हणाले की, पावसामुळे गेल्या दीड वर्षात दोन लाख 37 हजार 971 शेतकरी बाधित झाले. एक लाख 83 हजार शेतकऱ्यांना 251 कोटी पेक्षा अधिक रक्कम नुकसान भरपाई म्हणून देण्यात आली आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी केवायसी केली नसल्यामुळे ते मदतीपासून वंचित आहे. त्यांनी तात्काळ केवायसी करावी, असे आवाहनही डॉ. पाटील यांनी यावेळी केले.

Previous articleमंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावेद मुश्रीफ गोकुळचे अध्यक्ष.
Next articleEXCLUSIVE ‘गांजाचा धूराळा !’ उदयनगरात 11 किलो गांजा हस्तगत ! – एका आरोपीसह 2 लाख 20 हजाराचा गांजा जप्त !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.