Home कोल्हापूर मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावेद मुश्रीफ गोकुळचे अध्यक्ष.

मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावेद मुश्रीफ गोकुळचे अध्यक्ष.

239

आशाताई बच्छाव

1001547653.jpg

मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावेद मुश्रीफ गोकुळचे अध्यक्ष. कोल्हापूर. (अविनाश शेलार यांजकडून). … ………. .…नाविद मुश्रीफ यांच्या नावाची अध्यक्षपदी घोषणा होताच बहुचर्चित कोल्हापूर दूध संघ अर्थात गोकुळ च्या राजकारणात महायुतीची पकड स्पष्ट झाली . आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या निवडीचा प्रभाव राहील .

कोल्हापूर दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ चे चेअरमन अरुण डोंगळे यांनी राजीनामा दिल्यानंतर नवा अध्यक्ष होणार कोण याबद्दल चर्चा जास्त प्रमाणात रंगली . प्रथमच जिल्ह्याचे राजकारण मुंबई तसेच मंत्रालयातून रंगू लागले त्यामुळे स्थानिक नेत्याचा कस लागलाच . महायुती की महाविकास आघाडी आपले वर्चस्व कायम ठेवणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते.
पहिल्यांदा शशिकांत पाटील चुयेकर यांचे नाव अध्यक्षपदी चर्चेत होते. अशातच आज नाविद मुश्रीफ यांचे नाव अध्यक्षपदी पुढे येताच जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली .
आणि जेष्ठ संचालक विश्वास पाटील यांना एक बंद लिफाफा आमदार सतेज पाटील यांनी दिला आणि नाविद मुश्रीफ यांच्या निवडीवरती एकच शिक्कामोर्तब झाला.

Previous articleबांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी कृती समिती भविष्यात मोठा संघर्ष करेल. – गुणवंत नागटिळे
Next articleकलेक्टर म्हणाले.. ‘शेतकऱ्यांनो वेळ न दवडता पेरणीची तयारी करा !’
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.