• Home
  • *जय शिवराय किसान संघटनेच्या वतीने* *धरणे आंदोलन करण्याचा इशारा*

*जय शिवराय किसान संघटनेच्या वतीने* *धरणे आंदोलन करण्याचा इशारा*

*जय शिवराय किसान संघटनेच्या वतीने*
*धरणे आंदोलन करण्याचा इशारा*

*युवा मराठा न्यूज नेटवर्क*

वारणा सहकारी साखर कारखान्याने गेल्यावर्षीची माहे फेब्रुवारी 15 नंतरचे ऊस बिले अद्यापही शेतकऱ्यांना आदा केलेली नाहीत. यासाठी जय शिवराय किसान संघटना व आंदोलक अंकुश यांनी माननीय साखर आयुक्त पुणे यांच्याकडून वारणा कारखान्यावर जप्ती आदेशाचे कारवाई केली होती. त्याला अनुसरून आज जय शिवराय किसान संघटनेचे वतीने माननीय तहसीलदार पन्हाळा यांच्याकडे कारखान्यावरती जप्ती आदेश लागू करून शेतकऱ्यांची बिले आदा करावीत यासाठी मागणी करण्यात आली. यावेळी तहसीलदार शेंडगे साहेब यांनी कारखान्यास दुसरी नोटीस काढली असल्याचे सांगितले, तसेच या वेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक भगत साहेब यांनी बुधवार दिनांक 28 ऑक्टोबर पर्यंत थकीत सर्व एफ आर पी ची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याचे सांगितले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे कारवाई साठी आक्रमक पवित्रा घेतला. गुरुवार दिनांक 28 ऑक्टोबर पर्यंत जर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा नाही झाले, तर 29 ऑक्टोबर नंतर तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा जय शिवराया च्या वतीने देण्यात आला. यावेळी उपस्थित जय शिवरायचे किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने, पन्हाळा तालुका अध्यक्ष बंडा पाटील, हातकणंगले तालुका अध्यक्ष गब्बर पाटील, संघटनेचे उपाध्यक्ष शिवाजी शिंदे, सदाशिव कुलकर्णी काका, शितल कांबळे, उत्तम पाटील तात्या, राजेश पाटील, अमित गर्जे, चंद्रकांत माने, बजरंग अवघडे, धनपाल खोत, संभाजी हजारे आदींसह ऊस उत्पादक शेतकरी हजर होते.
*जिल्हा प्रतिनिधी कोल्हापूर .*

anews Banner

Leave A Comment