Home वाशिम अनसिंग येथे घरोघरी पोहोचल्या अक्षदा. 22 जानेवारीला होणार प्राणप्रतिष्ठा सोहळा.

अनसिंग येथे घरोघरी पोहोचल्या अक्षदा. 22 जानेवारीला होणार प्राणप्रतिष्ठा सोहळा.

334
0

आशाताई बच्छाव

IMG_20240114_174812.jpg

अनसिंग येथे घरोघरी पोहोचल्या अक्षदा.

22 जानेवारीला होणार प्राणप्रतिष्ठा सोहळा.

अनसिंग/ वाशीम ( गोपाल तिवारी ब्युरो चीफ)

अयोध्या येथे 22 जानेवारी 2024 रोजी श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होत असून देशातील कोट्यवधी नागरिकांनी या सोहळ्याचे निमंत्रन कलश फिरवून अक्षद वाटप करून दिल्या जात असतांना अनसिंग ह्या गावात घरोघरी हजारोच्या वर अक्षदाचे वाटप करण्यात आले असून घरातील प्रत्येकांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे.

समस्त हिंदु बांधवासाठी श्रद्धास्थान असणाऱ्या अयोध्या येथील भगवान प्रभू रामचंद्र यांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा ही येत्या 22 जानेवारी 2024 रोजी होत असून ऐतिहासिक या भव्य होणाऱ्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण देशातील नागरिकांना दिल्या जात आहे.
ह्यासाठी कलश शोभायात्रा काढून गावागावात घराघरात फिरून पवित्र अक्षदाचे वाटप आमंत्रण म्हणून केल्या जात आहे असून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण दिल्या जात आहे.त्याचबरोबर जवळच्या मंदिरात सामूहिकरित्या एकत्रित येऊन भजन कीर्तन करणे तसेच मंदिरात असणाऱ्या देवीदेवतांचे भजन आरती पूजा व श्रीराम जय राम जय जय राम विजय महामंत्राचा 108 सामूहिक जप करणे, या प्रकारचे कार्यक्रम घेण्याचे आवाहन ही घराघरात फिरून केल्या जात आहे. तसेच या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे लाईव्ह दृश्य टेलिव्हिजन व एलईडी स्क्रीनवर सरळ दाखविल्या जाणार असल्याने तसेच टीव्हीच्या विविध माध्यमाच्या चॅनलव्दारे याचे प्रसारण केल्या जाणार असल्याने, हे पाहावे असेही आवाहन केल्या जात असून तसे निवेदन पत्र ही प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचविल्या जात आहे.

घराघरात वाटल्या जाणाऱ्या निवेदन पत्रात अयोध्या येथे निर्मित होणाऱ्या प्रभू श्रीराम यांच्या श्रीराम जन्मभूमी मंदिराचे सविस्तर विवरण माहिती देण्यात आली आहे. तसेच प्रत्येक घराघरात अक्षद व निमंत्रण पत्रिकांचे वाटप परीक्षितजी जावळे नागपूर प्रांत सहप्रचारक, मयूरजी निखार वाशिम जिल्हा प्रचारक,योगेशजी मोरे तालुका प्रचारक, मदनजी काळे तालुका कार्यवाह अनसिंग मंडल स्वयंम सेवक ह्यांच्या उपस्थितित पार पाडण्यात आला आहे.

Previous articleसावित्रीबाई फुले पुरस्कारासाठी वनसगाव विद्यालयाच्या आदर्श शिक्षिका सौ उमा (जयश्री )चव्हाण यांची निवड
Next articleजनता विद्यालयात युवादिन साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here