Home उतर महाराष्ट्र सावित्रीबाई फुले पुरस्कारासाठी वनसगाव विद्यालयाच्या आदर्श शिक्षिका सौ उमा (जयश्री )चव्हाण यांची...

सावित्रीबाई फुले पुरस्कारासाठी वनसगाव विद्यालयाच्या आदर्श शिक्षिका सौ उमा (जयश्री )चव्हाण यांची निवड

249
0

आशाताई बच्छाव

IMG_20240114_165751.jpg

सावित्रीबाई फुले पुरस्कारासाठी वनसगाव विद्यालयाच्या आदर्श शिक्षिका सौ उमा (जयश्री )चव्हाण यांची निवड

सात्रळ (राहुरी) विद्यालयात १९ जानेवारी रोजी पारितोषिक वितरण—

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वनसगाव तालुका निफाड येथील आदर्श शिक्षिका सौ उमा (जयश्री) अर्जुन चव्हाण यांची वनसगाव विद्यालयात राबवित असलेल्या विविध उल्लेखनीय उपक्रमांची दखल घेत सावित्रीबाई फुले पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य सी डी रोटे व पर्यवेक्षक के बी दरेकर यांनी दिली आहे.
रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग, अहमदनगर यांचे विद्यमाने मातोश्री शांताबाई पुंजाजी कडू पाटील ‘स्मृती पारितोषिक’ समारंभ रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभाग अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या,शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, व गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक दिले जाणार आहे.
सावित्रीबाई फुले पुरस्कार वितरण सोहळा मातोश्री शांताबाई पुंजाजी कडू पाटील स्मृती पारितोषिक समारंभ दिनांक १९ जानेवारी २०२४ रोजी नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय, सात्रळ ता. राहुरी जि. अहमदनगर येथे संपन्न होणार आहे. रोख ११००० रुपये व स्मृतिचिन्ह तसेच शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ आमदार आशुतोष दादा काळे, विभागीय अधिकारी अध्यक्ष, सल्लागार समिती रयत शिक्षण संस्था, उत्तर विभाग, अहमदनगर यांच्या शुभहस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरित होणार आहे.
१) स्वच्छ व सुंदर शाळा- पारितोषिकाचे स्वरूप “स्मृतिचिन्ह” व रोख रू.५०००/-
२) कृतिशील मुख्याध्यापक :- पारितोषिकाचे स्वरूप “स्मृतिचिन्ह” व रोख रू.११०००/-
३) उपक्रमशील शिक्षक :- पारितोषिकाचे स्वरूप “स्मृतिचिन्ह” व रोख रू.११०००/-
४) सावित्रीबाई फुले पुरस्कार (फक्त महिला शिक्षिका):- पारितोषिकाचे स्वरूप . “स्मृतिचिन्ह” व रोख रू.११०००/- असे एकंदरीत पुरस्कार वितरण होणार आहे.
या निवडीबद्दल आमदार आशुतोष दादा काळे विभागीय अध्यक्ष उत्तर विभाग रयत शिक्षण संस्था, रयत शिक्षण संस्थेचे व्हा चेअरमन अँड भगीरथ शिंदे ,जनरल बॉडी सदस्य डॉ. सुजित जी गुंजाळ, उत्तर विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे,सहाय्यक विभागीय अधिकारी बाळासाहेब नाईकवाडी, प्रमोद तोरणे, गट शाखेचे प्राचार्य नंदकुमार देवढे विंचूर , संस्थेचे लाईफ मेंबर राजेंद्र चांदे. विंचूर , वनसगाव विद्यालयाचे प्राचार्य सी डी रोटे, पर्यवेक्षक के बी दरेकर, रुई विद्यालयाचे प्राचार्य गोरखनाथ तेलोरे, टाकळी (विंचूर )मुख्याध्यापक सुकदेव लभडे, चांदोरीचे प्राचार्य सोमवंशी, लाईफ वर्कर कैलास बागले, चौगांव विद्यालयाचे मुख्याध्यापक पावरा सर,
विस्तार अधिकारी वसंत गायकवाड, केंद्र प्रमुख किरण निंबेकर तसेच वनसगाव विद्यालयातील सर्व समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य तसेच सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य, सर्व ग्रामस्थ,पालक, शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी आदींनी अभिनंदन केले आहे.

Previous articleसोनंईत आस्था आरोग्य सुविधा केंद्राचे उद्घाटन संपन्न
Next articleअनसिंग येथे घरोघरी पोहोचल्या अक्षदा. 22 जानेवारीला होणार प्राणप्रतिष्ठा सोहळा.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here