Home वाशिम जैन महाविद्यालयाच्या रासेयो शिबिराचा समारोप संपन्न

जैन महाविद्यालयाच्या रासेयो शिबिराचा समारोप संपन्न

402
0

राजेंद्र पाटील राऊत

जैन महाविद्यालयाच्या रासेयो शिबिराचा समारोप संपन्न

समारोपाच्या प्रसंगी दत्तक गावातील अनाथ महिला दगडूबाई यांना प्राध्यापक, कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी दातृत्व भावनेतून रोख निधीच्या माध्यमातून मदत केली.
वाशिम:-(रितेश गाडेकर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क) अनसिंग येथील पी.डी जैन कला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप दत्तक ग्राम खडसिंग येथे नुकताच संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्रा. डाँ. अनील जैन, प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय समन्वयक डॉ. गजानन बनचरे, महिला कार्यक्रमाधिकारी प्रा वैशाली गोरे, समाजसेवक पांडूरंग पांढरे, तलाठी विष्णू दवणे, महेश अवस्थी आदी मान्यवर उपस्थित होते. संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातील सात दिवसांमध्ये श्रमदानाच्या माध्यमातून ग्रामस्वच्छता, जलसिंचनासाठी ई क्लास जमिनीवरती चर,शोषखड्डे खोदण्याचे सोबतच बौद्धिक क्षेत्रामध्ये जीवन जगण्याची कला, संचालन कसे करावे ?, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, भारतीय दर्शनशास्त्र, जीवनात खेळाचे महत्व, व्यक्तिमत्त्व विकास व कौशल्य विकास अशा विविध विषयावर बौद्धिक सत्रामध्ये ज्ञानदानाचे कार्य पार पाडले. रात्रीच्या संस्कृतीक कार्यक्रमातून व आरोग्याच्या विविध तपासण्या दंत व नेत्रचिकित्सा आधी सुविधेच्या माध्यमातून गावकऱ्यांची मन जिंकण्याचे काम या शिबिराच्या माध्यमातून झाल्याचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सचितानंद बिचेवार यांनी प्रास्ताविकातून यावेळी सांगितले. याच वेळी क्षेत्रीय समन्वयक म्हणून गजानन बनचरे यांनी विद्यार्थ्यांना महत्वाचे सेवेचे धडे दिले. अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करताना डॉ. जैन यांनी सुद्धा शिबिराच्या काही त्रुटी गृहीत धरून भविष्यामध्ये सुंदर पद्धतीने आपण वाटचाल कशी करावी या संदर्भाने महत्त्वाच्या टिप्स दिल्या. विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या मनोगतातून शिबिरातून मिळालेले वेगवेगळे धडे, संस्कार हे आमच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे मान्य केले. याच वेळी उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून नीरज कांबळे,कुमारी प्रतीक्षा सातव, उत्कृष्ट ग्रुप लीडर म्हणून आकाश घटमाल, उत्कृष्ट ग्रुप म्हणून निलेश गिरी व टीम, उत्कृष्ट वक्ता म्हणून आशिष देशपांडे आदींचा यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे संचालक गणेश चिखलकर व अस्मिता गाडेकर यांनी तर निलेश गिरी यांनी आभार प्रदर्शन केले.शिबिराच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, कर्मचारी गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व इतर सेवक व विद्यार्थ्यांनी महत्त्वपूर्ण स्वरूपाची परिश्रम केले. यातूनच शिबिर यशस्वी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here