• Home
  • भारतीय स्वातंत्र्याची वाटचाल रोमहर्षक

भारतीय स्वातंत्र्याची वाटचाल रोमहर्षक

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220324-WA0030.jpg

भारतीय स्वातंत्र्याची वाटचाल रोमहर्षक

वाशिम:- (रितेश गाडेकर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- अनसिंग येथिल जैन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा विशेष शिबिरामध्ये बोलत असताना प्रा.डॉ.भाऊराव तनपुरे यांनी आपले मत व्यक्त केले.
दि. 23 मार्च रोजी दुपारच्या बौद्धिक सत्रात मार्गदर्शक म्हणून डाँ तनपूरे यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षाचा आढावा घेऊन आपली वाटचाल, त्यामध्ये राजकीय धूरीणांच्या भूमिका मांडून एकमेकांना खालीखेचण्याच्या भूमिकेने देशाचे मोठे वाटोळे केल्याचे सांगितले. आपली स्वातंत्र्यासाठीची वाटचाल रोमहर्षक होती, पण त्यानंतर मात्र आपण सिथिल झाल्याचे सांगितले.
याचवेळी प्रा. डाँ वेदप्रकाश डोणगावकर यांनी भारतीय मूल्य व्यवस्थेच्या संदर्भात महत्वाची मांडणी करून वेगवेगळी दर्शनशास्त्रे आपल्या अध्यात्मिक जीवनाची आधारस्तंभ असून त्याचा व्यवस्थित अभ्यास करून आपण वाटचाल केली पाहिजे असे त्यांनी विविध उदाहरणातून पटवून दिले..
रात्रीच्या सत्रात सेंद्रीय शेती आणि आपले आरोग्य या विषयावर राजुभाऊ इंगळे या शिबीरार्थी व गावकरी मंडळींना नवनवीन योजनांची माहिती दिली…. आपल्या सेंद्रिय उत्पादनातून भारतीयांचे आरोग्य जोपासने म्हणजेच खरी देशसेवा करणे होय असे त्यांनी सांगितले…यावेळी कार्यक्रम संचालन प्रतिक्षा सातव व आरती इंगळे हिने केले..

anews Banner

Leave A Comment