Home उतर महाराष्ट्र सोनंईत आस्था आरोग्य सुविधा केंद्राचे उद्घाटन संपन्न

सोनंईत आस्था आरोग्य सुविधा केंद्राचे उद्घाटन संपन्न

52
0

आशाताई बच्छाव

IMG_20240114_165120.jpg

सोनई / नेवासा,(कारभारी गव्हाणे):- येथील पसायदान-आनंदवन सेवाभावी संस्था संचलित आस्था आरोग्य सुविधा केंद्राचे उदघाटन सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत उध्दव महाराज मंडलिक व जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनिल गडाख यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.

आनंदवनच्या ध्यानमंदीर परीसरात नव्याने बांधण्यात आलेल्या आस्था केंद्राचे उदघाटन सुनिल गडाख यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. ध्यानमंदीरात झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव संजय गर्जे यांनी केले. उपाध्यक्ष विनायक दरंदले, ‘आस्था’ उपक्रमाचे अध्यक्ष डाॅ.तुषार दराडे,किशोर घावटे, सच्चिदानंद कुरकुटे, कृष्णा सुद्रिक, शहाराम तांदळे, यांनी मान्यवरांचा सत्कार केला.

आशिर्वादपर भाषणात उध्दव महाराज यांनी समाजातील दु:खाचे रुपांतर आनंदात करीत असलेल्या आनंदवनचे कार्य इतर सेवाभावी संस्थेला प्रेरणादायक असल्याचे सांगितले. जेष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या विचारांचा यज्ञ सातत्यपूर्ण प्रज्वलित ठेवण्याचे कार्य महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. सुनिल गडाख यांनी आनंदवनच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

 

कार्यक्रमास निरंकारी परिवाराचे विठ्ठल महाराज खाडे,गोविंद महाराज निमसे,नगरचे माजी नगरसेवक पैलवान सुभाष लोंढे, भाऊसाहेब पांडोळे,प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाॅ.संतोष विधाटे,डाॅ.अशोक तुवर,डाॅ. रामनाथ बडे,चंद्रकांत आढाव, गणेश हापसे,योगेश महामीने, परेश लोढा,संदीप अण्णासाहेब दरंदले,राजु घाटोळे, विशाल भळगट, रवी ससाणे,राजु साळवे उपस्थित होते.

आनंदवनच्या उपक्रमास देणगी दिलेल्या सुरेश सिंहमार, आर एन रेपाळे, हरिभाऊ दरंदले,बी एस बानकर, संजय शिरसाठ, सचीन काळे,किशोर खोसे,मेजर गणपत कवडे, संदीप घोलप, उमेश औटी,शाम कडेल यांचा ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. डाॅ.तुषार दराडे यांनी सुत्रसंचालन केले. अरुण घावटे यांनी आभार मानले.

Previous articleकौंडण्यपूर पिठाधीश जगद्गुरु राजेश्वर माऊली यांना जीवे मारण्याची धमकी पत्र.
Next articleसावित्रीबाई फुले पुरस्कारासाठी वनसगाव विद्यालयाच्या आदर्श शिक्षिका सौ उमा (जयश्री )चव्हाण यांची निवड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here