Home नाशिक लासलगाव येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराला वर्दी पाठक यांनी दिले संपुर्ण भजन...

लासलगाव येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराला वर्दी पाठक यांनी दिले संपुर्ण भजन साहित्य भेट–

69
0

आशाताई बच्छाव

IMG-20230630-WA0038.jpg

लासलगाव येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराला वर्दी पाठक यांनी दिले संपुर्ण भजन साहित्य भेट–

महाभिषेकाचे प्रथम वर्षाचे मानकरी होण्याचा मान कुलकर्णी व पाठक दांपत्यानी मिळविला

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

अल्पावधीत पुर्णत्वास गेलेल्या श्रीक्षेत्र लासलगाव (बालाजीनगर) तालुका निफाड येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात आषाढी एकादशीचे औचित्य साधत ब्राह्मण सेवा मंडळाच्या वतीने महा अभिषेकाचे आयोजन करण्यात आले होते.प्रथम वर्षाचे मानकरी ब्राह्मण सेवा मंडळाचे विश्वस्त प्रफुल्ल कुलकर्णी, अमृता कुलकर्णी तसेच शरद रघुनाथ पाठक, सौ शुभांगी ताई पाठक नासिक हे ठरले.
ब्राह्मण सेवा मंडळाच्या संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरात नेहमीच धार्मिक व सामाजिक कार्य राबविण्यात येत असतात. लहान मुलांवर संस्कार घडवण्यासाठी दर शनिवारी हनुमान चालीसा पठण होते तसेच भावी पिढी संस्कारक्षम होण्यासाठी सातत्याने समाज प्रबोधन कार्यक्रम घेण्यात येतात. आषाढी एकादशी निमित्त माऊलींना महाअभिषेक करण्यात आला. शरद जी पाठक यांच्या माध्यमातून संपूर्ण भजन साहित्य आज मंदिराला समर्पित करण्यात आले अशी माहिती ब्राह्मण सेवा मंडळ विश्वस्त सचिव दिलीप कुलकर्णी यांनी दिली. कर्तव्य आणि दातृत्व याची उत्तम सांगड घालत पाठक परिवाराकडून भजन साहित्यासाठी ब्राह्मण सेवा मंडळाच्या वतीने त्यांचा ऋणनिर्देश म्हणून सन्मान करण्यात आल्याची माहिती उपाध्यक्ष वसंत दंडवते यांनी दिली. अभिषेकानंतर भजन व प्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी मंडळाचे विश्वस्त सचिव दिलीप कुलकर्णी, उपाध्यक्ष वसंत दंडवते ,खजिनदार शेखर कुलकर्णी, सदस्य आतिश कुलकर्णी ,ब्राह्मण महासंघ विश्वस्त तथा मैत्रेयी महिला मंडळ अध्यक्ष स्मिताताई कुलकर्णी ,मैत्रेयी महिला मंडळ कार्याध्यक्ष अक्षदा जोशी ,सह कार्याध्यक्ष रजनी कुलकर्णी ,उपाध्यक्ष प्राजक्ता भंडारी ,नाशिक जिल्हा युवा अध्यक्ष ब्राह्मण महासंघ गणेश जोशी, ब्राह्मण सेवा मंडळाचे राजेंद्र कुलकर्णी, दिनेश जोशी, संदीप दीक्षित ,मंदिर व्यवस्थापक सुशील जोशी, सुजाता भंडारी, सामाजिक कार्यकर्ते निलेश जगताप, कविता चव्हाण, डॉ सुरसे ,सुनंदा डागा, संतोष डागा व परिसरातील बांधव उपस्थित होते.

Previous articleकुरुळी | निघोजे, केळगाव, वडगाव घेनंद, मरकळ, सोळू, पिंपळगाव, कोयाळी, खेड तालुका भागात पेरण्या सुरू.
Next articleदावचवाडीला योगेश्वर विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा संपन्न—
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here