Home नाशिक देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी सुलभा आहेर तर उपनगराध्यक्षपदी अशोक आहेर यांची बिनविरोध निवड

देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी सुलभा आहेर तर उपनगराध्यक्षपदी अशोक आहेर यांची बिनविरोध निवड

34
0

आशाताई बच्छाव

IMG-20221229-WA0022.jpg

देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी सुलभा आहेर तर उपनगराध्यक्षपदी अशोक आहेर यांची बिनविरोध निवड

देवळा तालुका प्रतिनिधी भिला आहेर :- देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी सुलभा जितेंद्र आहेर यांची तर उपनगराध्यक्षपदी अशोक संतोष आहेर यांची आज गुरुवारी(दि.२९) रोजी झालेल्या नगरसेवकांच्या विशेष सभेप्रसंगी बिनविरोध निवड करण्यात आली. तहसीलदार तथा पीठासीन अधिकारी विजय सूर्यवंशी हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सभेच्या अध्यक्षस्थानी होते.
देवळा नगरपंचायतीच्या
तत्कालीन नगराध्यक्षा भारती आहेर व उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर यांनी
आवर्त पद्धती नुसार राजीनामा दिल्याने या रिक्त पदांच्या जागेसाठी नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी आज गुरुवारी (दि २९) रोजी सकाळी १० वाजता तहसीलदार विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायतीच्या सभागृहात नगरसेवकांची विशेष सभा घेण्यात आली . यावेळी नगराध्यक्ष पदासाठी सुलभा जितेंद्र आहेर व उपनगराध्यक्षपदासाठी अशोक संतोष आहेर या दोघांचा निर्धारित वेळेत एक एक उमेदवारी अर्ज दाखल झाला. सुलभा आहेर यांच्या अर्जावर सूचक म्हणून सुनंदा आहेर आणि अनुमोदक म्हणून शीला आहेर यांची तर उपनगराध्यक्ष अशोक आहेर यांच्या अर्जावर सूचक म्हणून मनोज आहेर यांची तर अनुमोदक म्हणून करण आहेर यांची स्वाक्षरी होती. दोन्ही पदांसाठी एकेकच अर्ज असल्याने नगराध्यक्षपदी सुलभा आहेर तर उपनगराध्यक्षपदी अशोक आहेर यांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा तहसीलदार तथा पीठासीन अधिकारी विजय सूर्यवंशी यांनी केली. मुख्याधिकारी नितीन बागुल यांनी सहाय्य केले . नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी पाचकंदील परिसरात फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. बैठकीस भारतीय जनता पक्षाचे गटनेते संजय आहेर ,नगरसेवक कैलास पवार, भूषण गांगुर्डे, सुनंदा आहेर, भाग्यश्री पवार, रत्ना मेतकर, अश्विनी चौधरी, राखी भिलोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे गटनेते संतोष शिंदे, ऐश्वर्या आहेर आदी सर्व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी मजूर फेडरेशनचे माजी चेअरमन व नवनिर्वाचित संचालक सतिष सोमवंशी , माजी सरपंच भाऊसाहेब पगार , माजी नगराध्यक्षा धनश्री आहेर , माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार ,लक्ष्मीकांत आहेर , भाजपचे तालुका अध्यक्ष किशोर चव्हाण , किशोर आहेर , प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, , डॉ. प्रशांत निकम , अनिल आहेर , अमोल आहेर , मुन्ना अहिरराव , माजी सरपंच नदिश थोरात , योगेश वाघमारे , प्रदीप आहेर ,दिलीप आहेर , सरपंच चंद्रकांत आहेर , प्रतीक आहेर , योगेश पाटील , बाळासाहेब गुंजाळ , डॉ . कोमल निकम , डॉ . अविनाश आहेर . नानू आहेर , बाळासाहेब मगर , भय्या आहेर , समाधान आहेर , साहेबराव आहेर ,श्रावण आहेर , सोनाथ वराडे ,किरण आहेर , विलास आढाव , मयूर आहेर , बापू आहेर ,अनिल रमन आहेर , आदी उपस्थित होते .
नूतन पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. देवळा शहराच्या विकासासाठी तसेच ‘स्वच्छ देवळा -सुंदर देवळा’ संकल्पनेच्या पूर्ततेसाठी आपण कटिबद्ध आहोत अशी ग्वाही नूतन नगराध्यक्षा सुलभा आहेर व उपनगराध्यक्ष अशोक आहेर यांनी यावेळी दिली.

Previous articleशिक्षण तज्ञ संचालक म्हणून श्रीयुत आबासाहेब यांची निवड
Next articleगडचिरोलीच्या प्रश्नांवर विधान परिषदेत चर्चा धान खरेदी, कृषी गोदाम आणि जंगलावरील उद्योग सुरू करा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here