• Home
  • 🛑 *ब्रेकिंग, पुणे : निवृत्त पोलीस निरीक्षकाने दारू पिऊन भरधाव कारने 5 जणांना चिरडलं ; १ जण ठार तर ४ जण गंभीर.* 🛑

🛑 *ब्रेकिंग, पुणे : निवृत्त पोलीस निरीक्षकाने दारू पिऊन भरधाव कारने 5 जणांना चिरडलं ; १ जण ठार तर ४ जण गंभीर.* 🛑

🛑 *ब्रेकिंग, पुणे : निवृत्त पोलीस निरीक्षकाने दारू पिऊन भरधाव कारने 5 जणांना चिरडलं ; १ जण ठार तर ४ जण गंभीर.* 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ पुणे शहरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने दारू पिऊन बेदरकारपणे वाहन चालवत 5 जणांना चिरडलं आहे. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. संजय निकम असं या निवृत्त पोलीस निरीक्षकाचं नाव आहे.

पुण्यातील बाणेर बालेवाडी परिसरातील चतुशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. दारूच्या नशेत असलेल्या संजय निकम याने रस्त्यावरील 5 जणांना उडवलं. तसंच एका टेम्पोलाही धडक दिली. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी निवृत्त पोलीस निरीक्षकाला ताब्यात घेतलं आहे.

आरोपी संजय निकम याची वैद्यकीय चाचणी केली असताना त्याने मद्य प्यायलं असल्याचं स्पष्ट झालं.

पोलीस प्रशासनात वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या संजय निकम याने असं कृत्य केल्याने सगळीकडे संतापाची लाट पसरली आहे. आरोपीच्या चुकीमुळे एका निष्पाप व्यक्तीला आपला जीव गमावावा लागला आहे, तर 4 जण मृत्यूशी झुंज देत आहेत.

त्यामुळे सदर आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे….⭕

anews Banner

Leave A Comment